मुंबई, 20 ऑक्टोबर: मुंबई विमानतळावर एका एअर हॉस्टेसला सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संबंधित एअर हॉस्टेस दुबईहून मुंबईला आली होती. तिच्या बॅगेत 4 किलो ग्रॅम सोने सापडले आहे. या सोन्याची बाजारातील किमत एक कोटी रुपये इतकी आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित एअर हॉस्टेसने सोने बॅगेच्या आत अंर्तवस्त्रांमध्ये लपवले होते.
मुंबई विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईतून एका खासगी विमान मुंबई विमानतळावर उतरले. या विमानातील एक एअर हॉस्टेस नियमांचे उल्लंघन करून सोने बॅगेत लपवून विमानतळाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करत होती. विमानतळावरील अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी चौकशी आणि बॅगेची तपासणी केली. बॅगेची तपासणी केली असता त्यात अंर्तवस्त्रांमध्ये सोन लपवल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित एअर हॉस्टेसला अटक करण्यात आले. चौकशी दरम्यान हे काम दुबईतील एका व्यक्तीने दिल्याचे सांगितले. या कामाचा मोबदला म्हणून संबंधित व्यक्तीने 60 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
30 किलो सोनं जप्त केले
दुसरीकडे मुंबई विमानतळावरील कार्गो टर्मिनलमधून डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजेंस(DRI)ने तब्बल 30 किलो सोनं आणि 60 किलो चांदी जप्त केली आहे. DRI मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं आणि चांदी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमधील एका कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी कंपनीतील कोणतीही व्यक्ती बेपत्ता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.