मुलुंडमध्ये सात फुट अजगराचा धुमाकूळ

मुलुंडमध्ये सात फुट अजगराचा धुमाकूळ

स्थानिकांनी सर्पमित्रांना पाचारण केले.अजगराच्या शोध सुरू केला पण अजगर काही केल्या सापडेना.मग तो जमिनीखालील पोकळ जागी गेला असावा म्हणून जेसीबी आणून जमीनही खोदली .त्याखाली हा अजगर सुस्त पडलेला आढळला.

  • Share this:

24 नोव्हेंबर : गुरुवारी दुपारी एक अजगराने मुलुंडकरांची चांगलीच झोप उडवली.मुलुंड पूर्व इथल्या मारुती अपार्टमेंटच्या गेटजवळ गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक स्थानिकाला रस्त्यावरच एक सात फूट अजगर दिसला.त्याने आरडाओरडा केला आणि या सोसायटीसह परिसरातील नागरिक जमा झाले.अजगराने लोकांना पाहून पळ काढला आणि लपून बसला.

स्थानिकांनी सर्पमित्रांना पाचारण केले.अजगराच्या शोध सुरू केला पण अजगर काही केल्या सापडेना.मग तो जमिनीखालील पोकळ जागी गेला असावा म्हणून जेसीबी आणून जमीनही खोदली .त्याखाली हा अजगर सुस्त पडलेला आढळला. त्याला सर्पमित्रांनी पकडलं पण पुन्हा एकदा सर्पमित्रांना गुंगारा दिला आणि एक स्कुटीमध्ये जाऊन बसला पण यावेळी सर्पमित्रांनी  त्याला पकडलं.

दुपारी बारा तर रात्री नऊ वाजेपर्यंत या अजगराच्या लपाछपीचा खेळ सुरू होता.त्याला पकडून जंगलात सोडून देण्यात आलं.यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 10:59 AM IST

ताज्या बातम्या