Elec-widget

कमला मिलमधील ३० रेस्टॉरंटला बारकक्ष नसतानाही परवाने

कमला मिलमधील ३० रेस्टॉरंटला बारकक्ष नसतानाही परवाने

कमला मिलमधील जवळपास 30 रेस्टॉरंटमध्ये बारकक्ष नसतानाही या हॉटेल्सना परवानगी देण्यात आली, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी केलाय.

  • Share this:

29 डिसेंबर : मुंबईतल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये काल जे अग्नितांडव झालं त्यानंतर सर्व यंत्रणांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यातच एक धक्कादायक माहिती समोर येतेय. कमला मिलमधील जवळपास 30 रेस्टॉरंटमध्ये बारकक्ष नसतानाही या हॉटेल्सना परवानगी देण्यात आली, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते बाळा वेंगुर्लेकर यांनी केलाय.तर पोलीस विभागाच्या छत्रछायेखालीच हा सगळा कारभार चालत असल्याचंही ते म्हणाले.

सर्व नियम धाब्यावर बसवून या सर्व रेस्टॉरंटना परवाने देण्यात आलेत. या सगळ्या प्रकाराकडे मुंबई महापालिका, अग्निशमन, आमि एक्साईज विभागानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही बाळा वेंगुर्लेकर यांनी केलाय.

आग लागलेल्या पबवर पावसाळ्यात ताडपत्री आणि बांबूच्या साहाय्याने  रुफ टॉप कव्हर करण्यात आलं होतं. ऑडिओ प्रुफिंगसाठी आतल्या बाजूनं काळ्या कापडाचा वापरही करण्यात आला होता. जेव्हा आग भडकली त्यावेळी, जळत्या बांबूचा सांगाळा लोकांच्या अंगावर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. या रेस्टॉरंटचं प्रवेशद्वार अतिशय अरुंद असल्यामुळे लोकांना बाहेर पडण्यास अडथळा निर्माण झाला होता. विशेष म्हणजे ६ ते ७ महिन्यांपूर्वीच वन-above सुरु झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...