कल्याणमध्ये महिलेची ट्रॅफिक महिला पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

कल्याणमध्ये महिलेची ट्रॅफिक महिला पोलिसाला धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

कल्याणमध्ये एका वाहनचालक महिलेनं महिला ट्रफिक पोलीस धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गाडी टो करण्याच्या वादातून महिलेनं हा तमाशा केला. नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करत असताना हा धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला.

  • Share this:

कल्याण, 26 नोव्हेंबर : कल्याणमध्ये एका वाहनचालक महिलेनं महिला ट्रफिक पोलीस  धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आलाय. गाडी टो करण्याच्या वादातून महिलेनं हा तमाशा केला. नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टो करत असताना हा धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला.

मॉलबाहेर पार्क केलेली महिलेची दुचाकी टोईंग व्हॅनने अनाऊंन्समेंट करून उचलली. मात्र यावेळी महिलेनं गाडी उतरवण्याची मागणी केली. यावरून तिचा आणि पोलीस यांच्यात वाद झाला. याच वादाचं रूपांतर धक्काबुक्कीत झालं.

दरम्यान, आपण जागेवर फाईन भरून गाडी देण्याची मागणी करत होतो, मात्र पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप महिलेनं केलाय. पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2017 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...