S M L

डोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

डोंबिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कल्याण जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी आरपीआय कार्यकर्ते काही दिवसांपासून करत होते.

Sonali Deshpande | Updated On: Mar 9, 2018 05:47 PM IST

डोंबिवलीत आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी

डोंबिवली, 09 मार्च : डोंबिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आरपीआयच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कल्याण जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी आरपीआय कार्यकर्ते काही दिवसांपासून करत होते. त्याचकरता आज आरपीआयच्या एका गटाने पत्रकार परिषद ठेवली आणि यात जिल्हाध्यक्ष बदला अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करणार आहोत असं सांगितलं.

पत्रकार परिषद संपताच जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी स्टेजवर येऊन जाब विचारत मारामारी केली.  ते सोडवण्यासाठी महिला आणि कार्येकर्ते एकमेकांना भिडले. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी महिलांना धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. यात महिला शहर अध्यक्षा वैशाली सावर्डेकर जखमी झाल्या. त्यामुळे आरपीआयच्या इतर कार्यकर्ते आणि महिला यांनी जिल्हाध्यक्षांना मारहाण केली.

विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पालिकेच्या  बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घडला. या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत असून बोलण्यास त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 9, 2018 05:47 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close