दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा लपाछपीचा खेळ, नागरिक संतप्त

दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचा लपाछपीचा खेळ, नागरिक संतप्त

यामध्ये फुलवाले, फळवाले, मोबाईलचं कव्हर विकणारे, खाद्य पदार्थ विकणारे सगळेच आहेत. पोलीस आले की फेरीवाले हटतात, पोलीस गेले की पुन्हा येऊन बसतात.

  • Share this:

मुंबई, 22 आॅक्टोबर : एलफिन्स्टन रोड स्थानकावर चेंगराचेंगरीनंतरही आपल्या यंत्रणांनी अजूनही धडा घेतलेला दिसत नाही. दादरसारख्या अती गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले पुन्हा बसू लागले आहेत.  यामध्ये फुलवाले, फळवाले, मोबाईलचं कव्हर विकणारे, खाद्य पदार्थ विकणारे सगळेच आहेत. पोलीस आले की फेरीवाले हटतात, पोलीस गेले की पुन्हा येऊन बसतात.

हा लपाछपीचा खेळ दिवसभर सुरू असतो. दादर स्थानकावरचा पूल रेल्वेनं मोकळा ठेवला असला, तरी पुलावरून खाली उतरलं की चालायचे वांधे होतात. कारण फेरीवाले तिथेच, टॅक्सीही तिथेच. या सगळ्यातून वाट काढत जावं लागतं. स्थानकाबाहेरचे रस्तेही अरुंद आहेत. वर गाड्यांसाठी पूल असल्यानं खालचा रस्ताही छोटा आहे.

एलफिन्स्टन सारखी घटना दादरमध्ये घडली तर लोकांना पळण्यासाठी जागा इथे अजिबात नाहीये. पण पालिकेला याचं काहीही पडलेलं नाही. कधीतरी थातुरमातुर कारवाई करायची आणि इतर वेळी फेरीवाल्यांकडे कानाडोळा करायचा, हेच पालिकेचं धोरण आहे असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2017 01:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...