भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 3 वर

भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 3 वर

भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

  • Share this:

भिवंडी, 24 नोव्हेंबर : भिवंडीच्या नवी वस्ती परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं माहिती समोर आली आहे.

नवी वस्तीहा परिसर दाटीवाटीचा आहे. बऱ्याच इमारतींचं बांधकाम कच्चं आहे. त्या अनधिकृतही आहेत. त्यामुळे याही इमारतीचा अपघात झाला असावा, अशी चर्चा आहे. सकाळच्या वेळेस घरी असणाऱ्यांची संख्या जास्त असते. या दुर्घटनेत रुक्सार याकुब खान( १८ ), अश्फाक मुस्ताक खान ( ३८) आणि जैबुन्निसा रफिक अन्सारी ( ६१)  या तिघांचा मृत्यू झालाय. तर नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर आयजीएम हाॅस्पिटल, ठाणे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून ढिगार उपासण्याचं काम सुरू आहे.

भिवंडी इमारत दुर्घटना

मृत्युमुखी :

१ रुक्सार याकुब खान ( १८ )

२ अश्फाक मुस्ताक खान ( ३८)

३ जैबुन्निसा रफिक अन्सारी ( ६१)

जखमी:

१ रेहान खान( ६)

२ सलमा अन्सारी(५५)

३ ख्वाजा महेमूद सय्यद( ५५)

४ आसिफ याकुब खान ( २१)

५ खान आबिद याकुब( २१)

६ शकील अल्लादिया अन्सारी ( ३७)

७ याकुब युसुफ खान ( ५८)

८ साबिरा याकुब पठान( ४५)

९ इमराना खान( २२)

First published: November 24, 2017, 5:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading