Home /News /mumbai /

37 हजार फूट उंचावर SpiceJet विमानासोबत थरारक घटना, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

37 हजार फूट उंचावर SpiceJet विमानासोबत थरारक घटना, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

अचानक पायलटसमोरील काचेला तडा गेल्याचे समोर आले. त्यावेळी विमान हे जमिनीपासून तब्बल 37 हजार फूट उंचावर होते.

    मुंबई, 28 मे :  मुंबई-गोरखपूर स्पाइस जेट (spicejet flight) विमानाला मोठा अपघात होता अगदी थोडक्यात टळला आहे. 37 हजार फूट उंचावर विमानासमोरील काचेला तडा गेला होता. पण, सुदैवाने विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचा जीव सुखरूप वाचला. मुंबईहून गोरखपूरला (spicejet mumbai to gorakhpur direct flight) जाण्यासाठी स्पाईस जेटचे बोइंग 737 विमान SG-385 रवाना झाले होते. पण, अचानक पायलटसमोरील काचेला तडा गेल्याचे समोर आले. त्यावेळी विमान हे जमिनीपासून तब्बल 37 हजार फूट उंचावर होते. त्यामुळे तातडीने हे विमान पुन्हा मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले. अवघ्या काही मिनिटात विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. या घटनेची माहिती तातडीने एटीसीला देण्यात आली आहे. (Aryan Khan नंतर रिया चक्रवर्ती ड्रग केसचा फेरतपास करा : अ‍ॅड. सतिश मानेशिंदे) अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.  सर्व प्रवाशांना तातडीने मुंबई विमातळावर उतरवण्यात आले असून दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, मुंबई विमानतळावरून उड्डाण भरत असताना ही चूक कुण्याचा लक्षात का आली नाही. असे अनेक सवाल उपस्थितीत झाले आहे. तीन दिवसांपूर्वीच स्पाइसजेटच्या सिस्टमवर सायबर हल्ला दरम्यान,  एयरलाइन्स कंपनी स्पाइसजेटच्या (Spicejet) सिस्टमवर सायबर हल्ला झाल्याचे तीन दिवसांपूर्वीच समोर आले होते. या हल्ल्यात कंपनीच्या अनेक कॉप्युटर्सवर निशाणा (Spicejet Ransomware Attack) साधण्यात आला. त्यामुळे बुधवारी सकाळी स्पाइसजेटची अनेक उड्डाणं उशिराने सुरू होती. प्रवाशांना या समस्येचा सामना करावा लागला. तसंच स्पाइसजेटने फ्लाइट उशिरा असल्याबाबत कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. (हेमांगी कवीनं हेक्टिक शेड्युवर शोधला रामबाण उपाय ! तब्ब्ल 16 तास केलं 'हे' काम) स्पाइसजेटने बुधवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करुन या रॅनसमवेअर हल्ल्याची माहिती दिली. यामुळे सकाळी असणाऱ्या उड्डाणांवर त्याचा परिणाम झाला. कंपनीने ट्विटमध्ये सांगितलं, की 'काल रात्री स्पाइसजेटच्या काही सिस्टमवर रॅनसमवेअरचा अटॅक झाला. त्यामुळे फ्लाइटवर याचा परिणाम झाला आहे. आमच्या आयटी टीमवर या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून सिस्टम दुरुस्ती केली आहे. आता उड्डाणं सुरळीत सुरू झाली आहेत.'
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या