Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : होय, शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं, एकनाथ शिंदे सभागृहात गरजले

Assembly Speaker Election : होय, शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं, एकनाथ शिंदे सभागृहात गरजले

ही पहिली घटना देशात घडली आहे की सत्तेतून पायउतार झाले. शिवसेना आणि भाजपचे सरकार आलं आहे

    मुंबई, 03 जुलै : 'ही पहिली घटना देशात घडली आहे की सत्तेतून पायउतार झाले. शिवसेना आणि भाजपचे सरकार आलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी आमचं सरकार आलं आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. 'ही पहिली घटना देशात घडली आहे की सत्तेतून पायउतार झाले. शिवसेना आणि भाजपचे सरकार आलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आलं आहे.  माझ्यासोबत 8 मंत्री होते. माझ्या 50 सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. कुणी म्हणाल आमच्या सोबत 15-20 आमदार आहेत, मी म्हणालो सांगा कोण आहेत ते. माझ्याकडे 50 जण असलेल्या  मला मुख्यमंत्रिपद दिलं. त्याबद्दल मी नरेंद्र मोदी, अमित शाह, यांना धन्यवाद देतो, असं शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, मग मला काय मिळणार होतं.सगळ्यांना वाटलं मला काही मिळणार नाही. मला कुठलीही अपेक्षा नव्हती. पण भाजपने मला संधी दिली, असं शिंदे म्हणाले. दरम्यान,विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज पार पडली.  शिरगणती करण्यात आली असून भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड आता निश्चित मानली जात आहे. शिरगणतीमध्ये शिंदे सरकारने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर नार्वेकर यांच्याविरोधात 107 मत पडली आहे. तर राहूल नार्वेकर  यांच्या बाजूने 164 मतं पडली आहे. तर 3 आमदार हे सदस्य तटस्थ होते. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या