Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : मतदान प्रक्रिया सुरू होताच झाला गोंधळ, जयंत पाटलांनी दाखवली चूक

Assembly Speaker Election : मतदान प्रक्रिया सुरू होताच झाला गोंधळ, जयंत पाटलांनी दाखवली चूक

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चूक लक्षात आणून दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिरगणती घ्यावी लागली.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चूक लक्षात आणून दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिरगणती घ्यावी लागली.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चूक लक्षात आणून दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिरगणती घ्यावी लागली.

    मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  सुरू झाली आहे. पण मतदानाच्या आधीच घोळ झाला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चूक लक्षात आणून दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिरगणती घ्यावी लागली. एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी बोलावलेले विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. सुरुवातील शिरगणती करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांचा पहिला क्रमांक होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस बसले होते. त्यानंतर तिसऱ्या  क्रमांकावर  गुलाबराव पाटील, चौथा क्रमांकावर उदय सामंत बसले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर चंद्रकांत पाटील बसले होते. पण जेव्हा शिरगणती सुरू झाली तेव्हा दिलेल्या क्रमांकाने मोजणी होत नसल्याचे जयंत पाटील यांनी लक्षात आणून दिले. त्यानंतर फडणवीस यांनीही पाटील यांचा आक्षेप योग्य असल्याचे म्हणाले. त्यानंतर पुन्हा एकदा शिरगणती सुरू झाली. दरम्यान,या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे. या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला. (हॉटेलमधून अटक झालेल्यांची ओळख पटली; अजित पवारांचं बंड मोडण्यातही प्रमुख भूमिका) तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू  असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या