Home /News /mumbai /

मोठी बातमी, ठाकरे सरकार देणार भाजपला शह, राज्यपालांच्या पत्राला पुन्हा केराची टोपली?

मोठी बातमी, ठाकरे सरकार देणार भाजपला शह, राज्यपालांच्या पत्राला पुन्हा केराची टोपली?

12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय अजूनही 8 महिन्यांपासून रखडलेला आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवड...

  मुंबई, 04 जुलै : पावसाळी अधिवेशनाला (monsoon season maharashtra) उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे. गेल्या 4 महिन्यांपासून विधानसभेचे अध्यक्षपद (assembly speaker election) रिक्तच आहे. राज्यपालांनी (governor bhagat singh koshyari) पत्र लिहून याची आठवण ठाकरे सरकारला (mva goverment) करून दिली. पण, 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय अजूनही 8 महिन्यांपासून रखडलेला आहे. त्यामुळेच ठाकरे सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवड टाळून राज्यपालांना निर्णय प्रलंबित कसा ठेवला जातो, हे दाखवणार आहे. दिव्य मराठी दिलेल्या वृत्तानुसार, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपद भरण्यात यावे, असं पत्र ठाकरे सरकारला पाठवले होते.  पण, राज्यपाल भाजपची मागणी लावून धरत दबाव आणत आहे. त्यामुळे राज्यपालांचा हा निर्णय डावलण्यात यावा, असा निर्णय या समन्वय समितीच्या बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

  तरुणानं अल्पवयीन प्रेयसीची केली हत्या, व्हिडिओ शेअर करत सांगतिलं धक्कादायक कारण

  नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. दोन अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली नाही.  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी राज्यपालांनी सरकाराला पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी आठवण करून दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीस यांच्या भेटीनंतर राज्यपालांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले होते. सिझनल फ्लू, खोकल्यापासून तुमच्या चिमुरड्यांना कसं ठेवाल सुरक्षित? घरगुती 6 उपाय दरम्यान, शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्याच्या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणुकीबाबत चर्चा झाली.  त्यामुळे तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना व्हीप बजावला आहे. शनिवारपर्यंत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आरटीपीसीआर टेस्ट करून रविवारपर्यंत दुपारी मुंबईत दाखल होण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ठाकरे राज्यपालांना पत्र पाठवतील का? रविवारी महाविकास आघाडीतील किती आमदारांची टेस्ट निगेटीव्ह आली आहेस याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर सायंकाळ कॅबिनेट बैठकीत किती आमदार टेस्ट निगेटीव्ह आली याची माहिती तीन पक्षाचे प्रमुख नेते देतील.  आमदारांची आकडेवारी पाहूनच मुख्यमंत्री ठाकरे त्यानंतर राज्यपाल यांना विधानसभा अध्यक्षपद कार्यक्रम घ्यावे, असे पत्र पाठवतील. जर आमदार पॉझिटीव्ह असतील तर मात्र निवडणूक घेण्यात येऊ नये, असा सूर राहील.  निवडणूक पत्र जर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल यांना पाठवले तर  राज्यपाल निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: राज्यपाल

  पुढील बातम्या