Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदे गटानेही बजावला व्हीप, गटनेतेपदी शिंदेच!

Assembly Speaker Election : शिवसेना पक्ष आमचाच, एकनाथ शिंदे गटानेही बजावला व्हीप, गटनेतेपदी शिंदेच!

 विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे.

विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे.

    मुंबई, 03 जुलै :  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election ) थोड्याच वेळात पार पडणार आहे. शिवसेनेनं (shivsena) आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटानेही व्हीप बजावला आहे. शिवसेनेच्या लेटर पॅडवर हा व्हीप बजावला असून यामध्ये राहुल नार्वेकर यांना विजयी करा असा आदेश काढला आहे. शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. आता पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार आणि एकनाथ शिंदे हे विधानभवनात आमनेसामने येणार आहे. राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे. या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला आहे.  ते अजूनही शिवसेनेतच आहेत हे पुन्हा एकदा पक्षादेश जारी करुन जाहीर केले. (दैनंदिन राशीभविष्य: कसा असेल तुमचा आजचा सुट्टीचा दिवस? वाचा सविस्तर) दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना मैदानात उतरवले आहे. एकनाथ शिंदे गटाचे सर्व आमदार रात्रीच मुंबईत दाखल झाले आहे. सर्व आमदारांचं ताज हॉटेलवर जंगी स्वागत करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी लढायची याबद्दल रणनीती ठरली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी एकत्र मिळून ही रणनीती ठरवली आहे. (हॉटेलमधून अटक झालेल्यांची ओळख पटली; अजित पवारांचं बंड मोडण्यातही प्रमुख भूमिका) तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू  असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या