Home /News /mumbai /

Assembly Speaker Election :शिंदे गटाचा दरारा, शिवसेनेचे आमदार पक्ष कार्यालय बंद करून बसले दुसरीकडे!

Assembly Speaker Election :शिंदे गटाचा दरारा, शिवसेनेचे आमदार पक्ष कार्यालय बंद करून बसले दुसरीकडे!

शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसले.

शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसले.

शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसले.

    मुंबई, 03 जुलै : एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election )  आज होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता विधानभवनातील शिवसेनेचे (shivsena) कार्यालय बंद करण्यात आले आहे. पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकार पाडले. या बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमनेसामने येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेल्या मतभेदांमध्ये हे कार्यालय बंद करण्यात आलं आहे. ती कोणाच्या सांगण्यावरून बंद करण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, शिंदे गटाकडून कार्यालयावर ताबा मिळवण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेनं हे कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. पक्ष कार्यालय बंद करून सेनेचे आमदार दुसरीकडे बसले.विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांच्या कार्यालयात शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरेंचे आमदार बसले आहे.  बंडखोर आमदार यांची संख्या जास्त असल्याने शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचा ताबा घेऊ नये यासाठी शिवसेना कार्यालय बंद करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. (दैनंदिन राशीभविष्य: कसा असेल तुमचा आजचा सुट्टीचा दिवस? वाचा सविस्तर) दरम्यान,राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आधीच व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही व्हीप बजावला आहे. या व्हीपमध्ये भाजपचे नेते राहुल नार्वेकर हे शिवसेना आणि भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहे. तसंच 2 तारखेला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही पक्षादेश पत्रावर गटनेते म्हणून नमुद आहे. तर आमदारांनी प्रतोद म्हणून नियुक्त केले होते भरत गोगावले यांचेही पक्षादेशावर नाव आहे. या पत्राद्वारे एकनाथ शिंदे गटाने पुन्हा एकदा शिवसेना पक्ष त्यांचाच असल्याचा दावा केला आहे. (हॉटेलमधून अटक झालेल्यांची ओळख पटली; अजित पवारांचं बंड मोडण्यातही प्रमुख भूमिका) तर महाविकास आघाडीकडूनही व्हीप बजावण्यात आला आहे. शिवसेनेनं प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी केला असून शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाही तो लागू  असणार आहे. मात्र, आमच्याकडे पुरेस संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेला व्हीप लागू होणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या