मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपची खेळी, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांची शिफारस टाळली?

12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपची खेळी, राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांची शिफारस टाळली?

 
महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 26 डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या  ( Assembly Speaker Election) निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारने  (mva government) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पत्रिका राज्यपालांकडे पाठवली आहे. पण, राज्यपालांनी (governor bhagat singh koshyari)  अद्याप यावर सही केली नाही. तर दुसरीकडे, भाजप आपल्या 12 आमदारांचं निलंबन (12 BJP MLAs suspended) मागे घेण्यासाठी खेळी करत आहे. त्यामुळे या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतील काही नेते बिनविरोध अध्यक्ष व्हावा यासाठी अनुकूल आहे तर दुसरीकडे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे असं महाविकास आघाडीतील काही नेत्यांचंही मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बिनविरोध निवडणुकीसाठी बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी की निवडीनंतर निलंबन मागे यावर मतमतांतर आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक झाल्यावर आमदारांचं निलंबन मागे घ्यावं तर निवडणुकीपूर्वी निलंबन मागे घेत अध्यक्ष बिनविरोध करण्याकडे भाजपचा कल आहे. राज्यपालांनी अद्यापही अध्यक्षपद निवडणूक प्रस्ताव ठराव कार्यक्रमाला सही केलेली नाही. त्यांनी यासाठी आणखी वेळ मागितला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची बिनविरोध निवड आणि 12 आमदारांचं निलंबन यावर तडजोडीचे राजकारण होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते शिवसेना विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांनी चर्चा केली. (हेही वाचा - पालकांनो सावधान! मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना होऊ शकते फसवणूक; अशी घ्या काळजी) 'राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. की त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे.  मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल उमेदवार काही मोठी बाब नाही. आमच्या पक्षात काय एका फोनवर उमेदवार ठरेल, अशी माहिती थोरात यांनी दिली. तर, विधानसभा अध्र्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमावर राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नाही. राज्यपालांना निवडणूक कार्यक्रमाच्या पद्धतीवर, बदललेल्या नियमाविषयी अभ्यास करायचा आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे.  12 निलंबित आमदार किंवा विधानपरिषदेचे १२ आमदार यावर चर्चा झाली नाही. नियमात बदल केलेत त्याविषयी राज्यपालांना कादेशीर दृष्ट्या अभ्यास करायचा आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या