Home /News /mumbai /

Goa Assembly Election Result: "भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला 'नोटा'पेक्षा कमी मते मिळाली" : संजय राऊत

Goa Assembly Election Result: "भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला 'नोटा'पेक्षा कमी मते मिळाली" : संजय राऊत

"भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला 'नोटा'पेक्षा कमी मते मिळाली" : संजय राऊत

"भाजपने वापरलेल्या नोटांमुळे आम्हाला 'नोटा'पेक्षा कमी मते मिळाली" : संजय राऊत

Assembly Election Result: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपने चार राज्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्याने सत्तेच्या जवळ पोहोचले आहेत.

    मुंबई, 10 मार्च : उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाचही राज्यांच्या विधानसभांचे निकाल (Assembly Election Result) आता समोर आले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. या निवडणूक निकालानंतर भाजपने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर निशाणा साधला होता. त्यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut reaction on BJP wins in 4 state assembly election) संजय राऊत म्हणाले, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राजकारणात ज्यांचा विजय होतो त्यांचं अभिनंदन करण्याची परंपरा आपल्या देशात आहे आणि त्यामुळे ज्या-ज्या राज्यात ज्या-ज्या पक्षाचा विजय झाला आहे त्यांचं मी पक्षातर्फे अभिनंदन करतो. पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळण्याची अपेक्षा होती पण पराभव झाला. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या सपापेक्षा अधिक चांगलं प्रदर्शन काँग्रेस करेल अशी अपेक्षा होती पण अपेक्षाहून कमी प्रदर्शन झालं. Election Results 2022 Live Updates: कोणाच्या डोक्यावर सजणार विजयाचा मुकूट?, पहा मतमोजणीचे प्रत्येक अपडेट्स दिल्लीतील कामांचा केजरीवालांना फायदा ज्या-ज्या ठिकाणी नागरिकांना एक पर्याय मिळाला तिथे मतदारांनी निवडलं. जसं की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला मतदारांनी निवडलं. दिल्लीत केजरीवाल यांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा झाला आणि काँग्रेस पक्षाची निवडणूक व्यवस्थापन पंजाबमध्ये चांगलं नव्हतं. भाजपला चार राज्यांत विजय मिळाला आहे तो त्यांच्या चांगल्या निवडणूक व्यवस्थापनाचाही एक भाग आहे असंही संजय राऊत म्हणाले. भाजपच्या नोटांपुढे कमी पडलो संजय राऊत यांनी म्हटलं, पने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्यापुढे आम्ही कमी पडलो. हे खरं आहे. पंजाबमध्ये भाजप एक राष्ट्रीय पक्ष असूनही पराभूत झाला. याचंही भाजपने उत्तर द्यावं. आम्हाला नोटांपेक्षा कमी मतं मिळाली कारण आमच्याकडे नोटा कमी होत्या. तरी उत्तरप्रदेश आणि गोव्यात आम्ही आमच्या पद्धतीने लढलो. ही लढाई सुरू राहील. कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो. ती सुरुवात असते. उत्तरप्रदेशात प्रियंका गांधी यांना चांगला प्रतिसाद मिळत होता पण त्यांना यश मिळाले याचा अर्थ लढाई संपली असा होत नाही. शिवसेनेच्या बाबतीत आम्ही जिथे-जिथे निवडणूक लढलो ती आमची सुरुवात आहे. भविष्यात आम्ही काम करत राहू. UP Election Result 2022: उत्तर प्रदेशात भाजपचाच डंका, पण औवैसींच्या AIMIM चं काय झालं? सुडाचं राजकारण सोडा या निकालामुळे भाजपला खूप मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्यांनी विजय पचवायला शिकलं पाहिजे. पराभव पचवणं अनेकदा सोपं असतं पण काहींना विजय पचवता येत नाही. मतदारांनी दिलेला विजय पचवा आणि सुडाने राजकारण न करता लोकशाही मार्गाने काम करा, देशाचं आणि राज्याचं हित पाहा इतकंच मी सांगतो असंही संजय राऊत म्हणाले. उत्तरप्रदेशात जर विरोधी पक्षाचं चांगलं मॅनेजमेंट झालं असतं, विशेषत: काँग्रेसला अखिलेश यादव यांनी सोबत घेतलं असंत तर त्याचा परिणाम निवडणुकीवर नक्कीच झाला असता. काँग्रेसने आपल्या धोरणात बदल करायला हवा. आम्ही गोवा आणि उत्तरप्रदेशात एकत्र लढण्यासाठी प्रयत्न केला. त्याचा नक्कीच फायदा झाला असता. भविष्यात आम्ही देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कसं काम करता येईल याकरता आम्ही एकत्र बसून चर्चा करु असंही संजय राऊत म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Assembly Election, Goa, Goa Election 2021, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या