नाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण

नाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण

शिवसेना जर खरंच स्वाभिमानी असती तर एवढा अपमान सहन केला नसता. सुभाष देसाईंनी राजीनामा द्यायला हवा होता

  • Share this:

मुंबई, 24 एप्रिल : नाणार प्रकल्पाचं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय. हे सर्व राज्य शासनामुळे झालंय अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीये.

नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. या वादाचा अशोक चव्हाण यांनी समाचार घेतला.  सुभाष देसाईंनी अधिसूचना रद्द करण्याचं जाहीर केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचं ते व्यक्तीगत मतं असल्याचं सांगितलं. मंत्र्यांचं मत हे व्यक्तीगत कसं असू शकतं ?, ते सरकाराचं मत असतं. मुळात सरडे रंग बदलतात पण सरड्यांनाही लाज वाटेल असं हे सरकार रंग बदलतंय अशी टीका चव्हाण यांनी केली.

सुभाष देसाई हे कॅबिनेट मंत्री आहे. त्यांच्या अंतर्गत उच्चाधिकार समिती असते. मंत्र्यांपेक्षा उच्चधिकार समिती मोठी नाही हे लक्षात घ्यायला हवं. शिवसेना जर खरंच स्वाभिमानी असती तर एवढा अपमान सहन केला नसता. सुभाष देसाईंनी राजीनामा द्यायला हवा होता असंही चव्हाण म्हणाले.

तसंच काँग्रेसचं नाणारला गेलेलं शिष्टमंडळ २८ तारखेला राहुल गांधींना भेटून अहवाल सादर करणार असल्याची माहितीही चव्हाणांनी दिली.

First published: April 24, 2018, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading