मुंबई, 05 डिसेंबर : 'कर्नाटकच्या आरे ला कारे करण्यापेक्षा आधी राजभवनावर जा. तिथे घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कटं न खाता त्यांना शिवरायांचा अपमान का करता हे विचारा', असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांना फटकारले.
कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल विधानामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
' छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर आधी कारवाई झाली पाहिजे. आशिष शेलार म्हणाले कर्नाटकच्या आरेला कारे करू, आधी राज्यपालांवर कारवाई करून दाखवा. हा नेंभळटपणा आहे. आधी तुम्ही राजभवनात घुसून त्यांचा चहा न पिता, त्यांची बिस्कटं न खाता त्यांना शिवरायांचा अपमान का करता हे विचारा, असा टोला राऊत यांनी शेलारांना लगावला.
('शेलारमामा नेभळटासारखे फक्त...',सेनेनं उडवली आशिष शेलारांची खिल्ली)
'छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ कोणतं हे महाराष्ट्रातला बच्चा बच्चा सांगू शकतो. पण भाजपने नवीन शोध लावला. कोकणामध्ये शिवरायांचा जन्म झाला आहे. इतिहासातून शिवनेरी काढून टाकायचं का, छत्रपतींचा जन्म हा महाराष्ट्रात झाला हे तरी मान्य आहे का, किंवा छत्रपती राजे जन्मला आले होते हे तरी मान्य आहे का, असा सवालही राऊत यांनी भाजपला विचारला.
'गुजरात निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी यांना बाजी लावावी लागत आहे. हा एक फार मोठा भाजपचं गुजरातमध्ये काय स्थान आहे, हे दिसून येत आहे. खरंच तर कोणताही प्रचार न करता भाजपने गुजरात निवडणूक जिंकली पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news