Home /News /mumbai /

बहुमत चाचणीला नसलेले ते आमदार नाराज? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण

बहुमत चाचणीला नसलेले ते आमदार नाराज? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण

अशोक चव्हाण म्हणाले, प्रथेप्रमाणे आधी चर्चा आणि नंतर मतदानाची प्रक्रिया होते. त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला. सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानंतर २-३ मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो होतो

    मुंबई 04 जुलै : आज सभागृहामध्ये शिंदे- फडणवीस सरकारची (Fadnavis Shinde Government) बहुमत चाचणी (Floor Test) झाली. या चाचणीसाठी आमदारांचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी - काँग्रेसचे जवळपास १० ते १२ आमदार गैरहजर होते. यात अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. यानंतर हे आमदार नाराज होते का? असा सवाल उपस्थित केला जात होता. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे शिवसैनिक असल्याचं सारखं का सांगावं लागतंय? अजितदादांनी फटकारलं अशोक चव्हाण म्हणाले, प्रथेप्रमाणे आधी चर्चा आणि नंतर मतदानाची प्रक्रिया होते. त्यामुळे आम्हाला यायला थोडा उशीर झाला. सभागृहाचे दरवाजे बंद झाल्यानंतर २-३ मिनिटातच आम्ही तिथे पोहोचलो होतो. आम्हाला तिथे यायला फक्त २-३ मिनिटच उशीर झाला होता. मात्र, बहुमत चाचणी आधीच सुरू झाल्याने आम्ही आत जाऊ शकलो नाही, असं ते म्हणाले. बहुमत चाचणीवेळी गैरहजर असलेले आमदार महाविकास आघाडीवर नाराज होते का? असा सवाल केला असता अशोक चव्हाण म्हणाले, की यात काहीही राजकीय अर्थ नाही. बाहेर मी एकटा नव्हतो तर राष्ट्रवादी-काँग्रेसचे जवळपास १०-१२ आमदार होते. यामागे कोणतंही राजकीय कारण किंवा नाराजी नाही. आम्ही आज आणि उद्याही महाविकास आघाडीसोबत आहोत. आम्ही कायम महाविकास आघाडीसोबत राहाणार आहोत, असं ते म्हणाले. 'फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय'; बाळासाहेब थोरातांची टोलेबाजी अशोक चव्हाण पुढे असंही म्हणाले, की आम्ही वेळेवर बहुमत चाचणीसाठी तिथे पोहोचलो नाही याचा फार फरक पडला नाही. भाजप-शिंदे यांच्याकडो 164 मतं होती. त्यामुळे बहुमत त्यांच्याकडेच होतं. एकूण इतके आमदार अनुपस्थित -  1नवाब मलिक -- राष्ट्रवादी 2-अनिल देशमुख --राष्ट्रवादी 3--जितेश अंतपुरकर--काँग्रेस 4-झिशान सिद्दीकी-- काँग्रेस 5दत्तात्रय भरणे -राष्ट्रवादी 6-अण्णा बनसोडे --राष्ट्रवादी 7-बबनदादा शिंदे --राष्ट्रवादी 8-राहुल नार्वेकर-- भाजप( मतदान करु शकत नाहीत) 9-मुक्ता टिळक-- भाजप 10लक्ष्मण जगताप--भाजप 11-मुफ्ती इस्माईल-- MIM 12- प्रणिती शिंदे--काँग्रेस 13अशोक चव्हाण--काँग्रेस 14-विजय वडेट्टीवार--काँग्रेस 15धीरज देशमुख--काँग्रेस 16कुणाल पाटील--काँग्रेस 17--आण्णा बनसोडे--राष्ट्रवादी 18--संग्राम जगताप-- राष्ट्रवादी 19-- दत्ता भरणे-- राष्ट्रवादी 20--राजू आवळे--काँग्रेस 21-मोहन हंबर्डे--काँग्रेस 22;शिरीष चौधरी--काँग्रेस
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ashok chavan, Eknath Shinde

    पुढील बातम्या