'तू जास्त लाचार की मी जास्त लाचार; सत्तेसाठी काँग्रेस अन् सेनेत स्पर्धा' आशिष शेलारांची टीका
'तू जास्त लाचार की मी जास्त लाचार; सत्तेसाठी काँग्रेस अन् सेनेत स्पर्धा' आशिष शेलारांची टीका
शिवसेनेसोबतच्या युवतीबाबत बोलताना ते म्हणाले, की आमची बाळासाहेब यांच्याबरोबर असणारी युती ही वैचारीक युती होती. बाळासाहेब यांच्यासोबत असणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानाच आहे.
तुषार रुपनवर, प्रतिनिधीमुंबई 25 जानेवारी : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar on Shivsena) यांनी अनेक मुद्द्यांवरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेसोबतच्या युवतीबाबत बोलताना ते म्हणाले, की आमची बाळासाहेब यांच्याबरोबर असणारी युती ही वैचारीक युती होती. बाळासाहेब यांच्यासोबत असणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानाच आहे. मात्र, उद्धव ठाकरेंवर त्यांनी निशाणा साधला. 370 कलमाच्या वेळी उद्धव ठाकरे तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी केला. तसंच याकूब मेननच्या फाशीला विरोध करणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात का आहे? असंही त्यांनी विचारलं
पुढे मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचं (Tipu Sultan) नाव दिल्यावरुनही आशिष शेलार यांनी सेनेवर टीका केली. ते म्हणाले, सत्तेसाठी लाचारी काय असते हे शिवसेनेकडे पाहून दिसतं. ज्यांनी याकूब मेननची बाजू घेतली ते मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात आहे यावर संजय राऊत काय बोलणार ? महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी तू जास्त लाचार की मी जास्त लाचार अशी स्पर्धा काँग्रेस आणि सेनेत सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.
यासोबतच संजय राऊत यांनी शेअर केलेल्या कार्टूनवरही आशिष शेलारांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तुमच्या संदर्भातील कार्टून कोणी प्रसारीत केले तर तुम्ही थेट नेव्हीच्या अधिकाऱ्यालाही मारहाण करता.
काय होतं राऊत यांचं ट्विट -
संजय राऊत यांनी एक ट्विट (Viral Tweet of Sanjay Raut) केलं होतं. त्या ट्विटमध्ये कोण कोणामुळे वाढले? उघडा डोळे…बघा नीट… असं कॅप्शन त्यांनी दिलं होतं. ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसल्याचं दिसत होतं. शिवसेना प्रमुखांचे पाय पुढच्या एका खुर्चीवर असून ते हॅव अ सीट असं विचारत असल्याचं वर लिहिण्यात आलं. बाजूला एक छोट स्टूलदेखील होतं. समोर एक व्यक्ती उभी राहिल्याचं व्यंगचित्रात दिसून आलं. याच व्यंगचित्रावरुन वादाला सुरुवात झाली. मात्र, संजय राऊतांनी आता हे ट्विट डिलीट केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.