उद्धट भाषा नको,माफी मागा,आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना ट्विटर टोला

उद्धट भाषा नको,माफी मागा,आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना ट्विटर टोला

  • Share this:

30 आॅगस्ट : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांनी आज उद्धव ठाकरेंना चांगलंच टार्गेट केलं. उद्धव यांच्या पत्रकार परिषदेनंतर शेलारांनी लागोपाठ 4 ट्विट केले. उद्धट भाषा बोलण्यापेक्षा ज्या प्रवाशांचे हाल झाले, त्यांची नम्रपणे माफी मागा आणि चुका दुरुस्त करायला लावा, असं शेलारांनी ट्विट केला.

या निसर्गाच्या मर्यादा की सत्ताधीशांचा मर्यादा ? प्रख्यात डॉ. अमरापूरकर कुठे गेले ? नालेसफाई झाली असा ढेकर दिला, पम घरांमध्ये शिरून संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे काय करणार, असा सवाल शेलारांनी केला.

नालेसफाई झाली असा "ढेकर" दिला.फोटो काढले.पण आता ज्यांच्या घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाले.त्यांचे काय करणार? असाही प्रश्न त्यांनी विचारला. पाण्याचा निचरा होत नाही तर सेना भाजपचं पाऊस राजकारण सुरू झालंय, हे नक्की.

मुंबईत मंगळवारी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजाॅय मेहता यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंवर प्रश्नाचा भडीमार केला.

माझा जनतेशी संपर्क नाही असं समजू नका. उलट, माझ्या कार्यकर्त्यांचा जनतेशी जितका संपर्क आहे आणि ज्याप्रकारे तो काल घराघरात गेला, तेवढे तुम्हीही गेले नसाल, असंही उद्धव ठाकरेंनी पत्रकारांनाच सुनावलं.

First published: August 30, 2017, 9:48 PM IST

ताज्या बातम्या