BJP-NCP Allaince: "2017 मध्येच भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापनेचं ठरलेलं, खातेवाटपाची चर्चाही झाली पण..." भाजप नेते आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट
BJP-NCP Allaince: "2017 मध्येच भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापनेचं ठरलेलं, खातेवाटपाची चर्चाही झाली पण..." भाजप नेते आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट
"2017मध्येच BJP-NCPच ठरलेलं, खातेवाटप चर्चाही झाली पण.."भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
Maharashtra: महाराष्ट्रात भाजप आणि राष्ट्रवादी यांचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती असा गौप्यस्फोट भाजप नेत्याने केला आहे.
मुंबई, 28 एप्रिल : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) सध्या मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीतील (MVA Government) शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांवर भाजप नेते आरोपांवर आरोप करत आहेत. तर मविआचे नेते त्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपवर सुद्धा आरोप करताना दिसून येत आहेत. मात्र, असे असतानाच आता भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं (BJP-NCP alliance) सरकार स्थापनेच्या संदर्भात 2017 मध्येच ठरलं होतं असा गौप्यस्फोट शेलारांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याच्या संदर्भात 2017 मध्येच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटप आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर खातेवाटपाच्या संदर्बातही चर्चा झाली होती. भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार असण्याच्या संदर्भात चर्चा झाली.
वाचा : राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेच्या संदर्भात मोठी बातमीयुतीची चर्चा झाली पण...
शिवसेनेला दूर न करण्याचा सल्ला भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी दिला होता. पण शिवसेना सोबत असताना युती करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिला आणि त्यामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन झालं नाही असं आशिष शेलार म्हणाले. दैनिक लोकसत्ताने आयोजित केलेल्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी हे विधान केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना-भाजप युतीमध्ये मैत्रिपूर्ण संबंध होते. पण बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेत्रृत्वात शिवसेनेसोबत भाजपचे पूर्वीसारखे मैत्रीपूर्ण संबंध राहिले नाहीत असंही आशिष शेलार यांनी म्हटलं.
आशिष शेलार यांनी केलेल्या या विधानावर आता राष्ट्पवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पहावं लागेल. तसेच 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात मुलाखत होणार आहे त्यावेळी उद्धव ठाकरे भाजप-राष्ट्रवादी युतीवर काय भाष्य करतात हे पहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.