अशांनाच खाल्ल्या ताटात घाण करणारे म्हणतात, शेलारांचं सेनेवर टीकास्त्र

अशांनाच खाल्ल्या ताटात घाण करणारे म्हणतात, शेलारांचं सेनेवर टीकास्त्र

नवरात्रीत शिमगा करणाऱ्यांना आईभवानी विवेक बुद्धी दे अशा शब्दांत शेलारांनी टीका केली.

  • Share this:

23 सप्टेंबर : खाल्ल्या ताटात घाण करणारे आशांनाच म्हणतात असं म्हणत भाजपचे मुंबईचे शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केलीये. ट्विटरच्या माध्यमातून शेलार यांनी सेनेला लक्ष्य केलंय.

आज राज्यभरतील प्रमुख शहरांत, शिवसेना महागाईच्या विरोधात आदोलन करतीये. घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात, हे आंदोलन करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सेनेच्या आंदोलनाचा आशिष शेलारांनी खरपूस समाचार घेतलाय.  टि्वट करत त्यांनी नवरात्रीत शिमगा करणाऱ्यांना आईभवानी विवेक बुद्धी दे अशा शब्दांत शेलारांनी टीका केली. तसंच सेनेनं नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला.  जे मोदींच्या नावाने निवडून आले.सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात असा टोलाही शेलारांनी लगावला.

शेलारांचं टि्वट

"जे मोदीजींच्या नावाने निवडून आले, सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे आशांनाच म्हणतात. नवरात्रीत शिमगा करणाऱ्यांना आईभवानी विवेकबुद्धी दे!"

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2017 05:03 PM IST

ताज्या बातम्या