मराठा मोर्चाचा अपमान करणाऱ्या सोंगाड्यांनी विचारू नये, शेलारांचा राऊतांना टोला

मराठा मोर्चाचा अपमान करणाऱ्या सोंगाड्यांनी विचारू नये, शेलारांचा राऊतांना टोला

" ज्यांनी मराठा मुक मोर्चाचा अपमान केला ते सोंगाडे आम्हाला विचारतात,घोंगड्या खाली काय? "

  • Share this:

16 सप्टेंबर : जे मुंबईत रस्ते,नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाही. नव्या कल्पनांचे "खड्डे" ज्यांच्याकडे आहे. त्यांनी उगाच बुलेट ट्रेन ची काळजी करू नये असा पलटवार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. तसंच ज्यांनी मराठा मुक मोर्चाचा अपमान केला ते सोंगाडे आम्हाला विचारतात,घोंगड्या खाली काय? असा टोलाही शेलार यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता लगावला.

बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन शिवसेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. आज सेनेचं मुखपत्र 'सामना'मधून 'तागडीवाल्यांच्या राज्यात देशासाठी तलवार चालविणाऱ्यांवर माती खाण्याची वेळ आली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचा टाइमपास उपक्रम नक्की किती काळ चालणार आहे?' असा प्रश्न विचारण्यात आलाय.

तसंच जपानच्या पंतप्रधानांच्या रोड शोनंतर अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा शिलान्यास होतो, पण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या अनेक आणि प्रचंड रोड शोनंतर त्या समाजाच्या मागण्यांसाठी एका उपसमितीचे घोंगडे फेकले जाते असंही अग्रलेखात म्हटलंय.

सेनेच्या या टीकेनंतर आशिष शेलार यांनी टि्वट करून सेनेचा चांगलाच समाचार घेतला.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकावे म्हणून भाजप सरकारचे काम सुरू आहे. मंत्रिमंडळ उपसमिती हे त्यातील एक पाऊल आहे.

ज्यांनी मराठा मुक मोर्चाचा अपमान केला ते सोंगाडे आम्हाला विचारतात,घोंगड्या खाली काय?आठवा निवडणुकीत किती ठिकाणी तुमचे खाली डोके वरती पाय झाले होते अशा शेलक्या शब्दांत आशिष शेलारांनी टीका केली.

तसंच जे मुंबईत रस्ते,नाल्यांच्या कामांचा दर्जा सांभाळू शकत नाही.नव्या कल्पनांचे "खड्डे" ज्यांच्याकडे आहे. त्यांनी उगाच बुलेट ट्रेन ची काळजी करू नये असा सल्लावजा टोलाही शेलारांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 08:55 PM IST

ताज्या बातम्या