नालेसफाईची माहिती सोशलमीडियावर जाहीर करावी, शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नालेसफाईची माहिती सोशलमीडियावर जाहीर करावी, शेलारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबईतली नालेसफाई वेगाने करावी आणि त्याची माहिती रोज सोशल मीडियावर टाकावी अशी मागणी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये. तसंच नालेसफाईत पारदर्शकता यावी अशी मागणीही शेलारांनी केली.

  • Share this:

11 मे : मुंबईतली नालेसफाई वेगाने करावी आणि त्याची माहिती रोज सोशल मीडियावर टाकावी अशी मागणी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये. तसंच नालेसफाईत पारदर्शकता यावी अशी मागणीही शेलारांनी केली.

भाजपचं शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अजाॅय मेहता यांनाही बोलावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी नालेसफाईबाबत आपण 100 टक्के असमाधानी असल्याचं शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं.

नालेसफाईच्या पाहणीचे 2 दौरे केल्यानंतर झालेल्या कामांबद्दल समाधानी नसल्याचं त्यांनी सांगितलं. या पाहणीच जे निदर्शनास आलं त्यातून या कामात अजून पारदर्शकता यायला हवी अशी विनंती शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले अशी माहिती शेलार यांनी दिली.

मात्र उद्धव यांच्या दौऱ्यावरून अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना परब यांची वृत्ती आंब्याच्या झाडाखाली बसून काकड्या किती लागल्या हे बघण्याची असल्याचा टोला शेलार यांनी लगावला.

First published: May 11, 2017, 6:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading