15 आॅक्टोबर : मुंबईत आज रविवारच्या सकाळी एक महत्त्वाची घडामोड घडली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार राज ठाकरेंना भेटायला गेले होते. राज यांचं निवासस्थान कृष्णकुंजवर ही भेट पार पडली.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. दोनच दिवसांपूर्वी मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत गेले. त्यावरही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं नाकारतं येत नाही.
शिवसेनेनं मनसेचे 6 उमेदवार फोडल्यानंतर भाजपनं उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला असा प्रचार सुरू केला होताच. त्यामुळे या भेटीबद्दल कमालीची उत्सुकता आहे.