आझाद मैदानात आशिष शेलारांना धक्काबुक्की !

आझाद मैदानात आशिष शेलारांना धक्काबुक्की !

आझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आशिष शेलार यांना धक्काबुक्की झालीय. मोर्चकऱ्यांनी त्यांना मैदानात येण्यापासूनही मज्जाव केलाय. 'आधी आरक्षण द्या मग मोर्चात या' अशा कडक शब्दात आंदोलकांनी आशिष शेलारांना यावेळी सुनावलं.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : आझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांकडून आशिष शेलार यांना धक्काबुक्की झालीय. मोर्चकऱ्यांनी त्यांना मैदानात येण्यापासूनही मज्जाव केलाय. 'आधी आरक्षण द्या मग मोर्चात या' अशा कडक शब्दात आंदोलकांनी आशिष शेलारांना यावेळी सुनावलं.

मराठा मोर्चे हे खरंतर आजवर शांतता आणि शिस्तबद्धतेसाठी ओळखले जातात. पण पहिल्यांदाच मराठा मोर्चात अशा पद्धतीची घटना घडलीय, तेही मुंबईतल्या मोर्चात. म्हणूनच मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. खरंतर जिजामाता उद्यानातून निघणारा हा मोर्चा आझाद मैदानात येऊन थांबणार आहे. पण त्याआधीच आंदोलकांनी आझाद मैदानात गर्दी केलीय.

भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारही आझाद मैदानावरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी तिथं पोहोचले होते. पण काही आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना आझाद मैदानात येण्यापासूनही रोखलं.

First published: August 9, 2017, 11:09 AM IST

ताज्या बातम्या