• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • काँग्रेसचा तीन पायांचा लंगडा पांगुळगाडा हरला, 'बुलेट ट्रेन' जिंकली-आशिष शेलार

काँग्रेसचा तीन पायांचा लंगडा पांगुळगाडा हरला, 'बुलेट ट्रेन' जिंकली-आशिष शेलार

या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचं भूमिपूजन केलं होतं. तेव्हा या बुलेट ट्रेनवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती

  • Share this:
18 डिसेंबर: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्यात यश आलं असलं तरी  काँग्रेसच्याही जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता या निकालांवर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारांनी टीका केली आहे. काँग्रेसचा लंगडा पांगूळगाडा हरला असून भाजपची बुलेट ट्रेन विकासाची जिंकली आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचं  भूमिपूजन केलं होतं. तेव्हा या बुलेट ट्रेनवर काँग्रेसने टीकेची झोड उठवली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने दलित नेता जिग्नेश मेवानी, पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि ओबीसी नेता अल्पेश ठाकोर यांच्याशी युती केली होती. त्यामुळे काँग्रेस जिंकेल की काय अशी चर्चाही सुरू झाली होती. पण या तीन नेत्यांनी एकत्र घेऊनही अखेर काँग्रेसचा पराभव झाला आहे. तर विकासाच्या मुद्द्यावर आणि बुलेट ट्रेनच्या जोरावर  भाजप यशस्वी झाली आहे असं  आशिष शेलार यांचं म्हणणं आहे. गुजरात निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले असून 102 जागांवप भाजपतर 75 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसच्या जागा जरी वाढल्या असल्या तरी अखेर भाजपने गुजरातचा गड राखला आहे.
First published: