निवडणूकच लढवली नाही त्यांनी EVM वर बोलू नये, राज यांना आशिष शेलारांचा टोला

निवडणूकच लढवली नाही त्यांनी EVM वर बोलू नये, राज यांना आशिष शेलारांचा टोला

शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. ज्यांनी कधी निवडणूकच लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करु नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राज यांना टोला लगावला आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट- आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या (ईव्हीएम) मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनचा (ईव्हीएम) वापर करण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेकापसह अन्य काही पक्षांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी ईव्हीएमवरून नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर ईव्हीएमवरून राज ठाकरे हे अधिकाधिक आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुसरीकडे, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांनी खोचक टीका केली आहे. ज्यांनी कधी निवडणूकच लढवली नाही त्यांनी ईव्हीएमवर भाष्य करु नये, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राज यांना टोला लगावला आहे.

आणखी काय म्हणाले आशिष शेलार?

ईव्हीएमविरोधात राज्यातील विरोधीपक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिय देताना शेलार म्हणाले, पत्रकार परिषद घेण्याआधी जे या ईव्हीएमद्वारेच निवडून आले आहेत, त्याविरोधी पक्षातल्या बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि अजित पवार यांनी आधी राजीनामे द्यावेत. तसेच या पत्रकार परिषदेत इतर जे कोणी होते त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी तर ईव्हीएमवर बोलूच नये, अशा खोचक शब्दांत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

नाचता येईना अंगण वाकडे...

विरोधकांना जनाधार राहिलेला नाही, लोक त्यांना स्विकारायला तयार नाहीत. पूर्णपणे कोसळलेले असताना विरोधकांचा एकमेकांना शेवटचा आधार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे. त्यामुळे ते ईव्हीएमवर टीका करीत आहेत. विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे.

राज ठाकरे ईडीच्या रडार?

राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांत ईडीकडून राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येईल, अशा आशयाचे वृत्त 'फ्री प्रेस'ने दिले आहे. 'कोहिनूर मिल 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरेंचा सहभाग असून याच कारणाने ते ईडीच्या निशाण्यावर आहेत,' असं फ्री प्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे अडचणीत येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

VIDEO: शपथ घेणारे तरी त्या पक्षात राहतील का, मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर राष्ट्रवादी

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-396273" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk2Mjcz/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या