Home /News /mumbai /

मोठी बातमी! संध्याकाळपर्यंत 50 आमदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार?

मोठी बातमी! संध्याकाळपर्यंत 50 आमदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार?

आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. 42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे.

    मुंबई 23 जून : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 पेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय आणखीही काही आमदार शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याचं समोर येत आहेत. अशात आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळपर्यंत शिवसेनेच्या शिंदे गटाची आमदार संख्या पन्नासवर पोहोचणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; आमदारांपाठोपाठ या खासदारांचंही एकनाथ शिंदेंना समर्थन 42 शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे एकूण 50 जण शिंदे गटात सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या या शिवसेना गटाचं पत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे अनेक बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ खासदारही (Shivsena MP) उद्धव ठाकरेंची साथ सोडत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे लोकसभेत 18 खासदार असून त्यातील अनेक खासदार आपला नवा गट स्थापन करणार आहेत. ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे आणि कल्याण लोकसभा खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सध्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात आहेत. वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आहेत तरी कुठे? एकनाथ शिंदे यांना भाजपकडून मोठी ऑफर मिळाल्याची चर्चा आणखी अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ उतरणार आहेत. पालघरचे खासदार राजेंद्र गावित हेदेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अशात आता आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे खासदारही एकनाथ शिंदेंच्या समर्थनात उतरल्याने उद्धव ठाकरेंच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Eknath Shinde, Maharashtra News, Maharashtra politics, Shiv sena

    पुढील बातम्या