• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • स्वेटर्स आणि मफलर काढून ठेवा, दिवाळी आधी राज्यात थंडीचा कडाका वाढणार!

स्वेटर्स आणि मफलर काढून ठेवा, दिवाळी आधी राज्यात थंडीचा कडाका वाढणार!

हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावं आणि सर्व नियमांचं पाल करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

 • Share this:
  मुंबई 8 नोव्हेंबर: दिवाळी आधी महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार (Cold wave in maharashtra) आहे. हवामान विभागाने (IMD) याविषयीचा अंदाज जाहीर केला आहे. या अंदाजानुसार राज्यात 8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीमध्ये किमान तापमान खाली जाईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भ,  मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र काही भागात किमान तापमान पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याचा अंदाज आहे. मॉन्सून उशीरा परतल्याने यावर्षी ऑक्टोब हिट (october heat) फारशी जाणवलीच नाही. आता थंडी पडायला सुरूवात झाल्याने कपाटातून स्वेटर्स, मफलर आणि इतर गरम कपडे काढून ठेवावे लागणार आहेत. मुंबईत वातावरण हे कायम दमट असतं. त्यामुळे घामांच्या धारांना सोबत घेतच प्रवास करावा लागतो. हिवाळ्याचे काही महिने हे मुंबईकरांसाठी सुखद असतात. मात्र यावर्षी कोरोनाचं संकट असल्याने बाहेर निघण्याआधी सगळ्यांनाच विचार करावा लागणार आहे. हिवाळ्यात प्रदुषणातही वाढ होत असते. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचं परतणं लांबल्याने ऑक्टोबरमध्ये चटका लावणाऱ्या उन्हाचं प्रमाणही कमी होत आहे. हे प्रमाण असचं राहिल्यास ऑक्टोबरमध्ये जाणवणाऱ्या कडक उन्हाचं प्रमाण हे संपून जाणार की काय अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत कोरोनाची रुग्ण संख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशात आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मास्क न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावं आणि सर्व नियमांचं पाल करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुंबईत कोरोना उपचारासाठीच्या ज्या जम्बो सुविधा निर्माण केल्या आहेत त्यांची देखभाल दुरूस्ती करावी. जेणेकरून आगामी काळात गरज भासल्यास त्यांचा वापर करता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  Published by:Ajay Kautikwar
  First published: