प्रेमाला विरोध केला म्हणून, प्रियकराने केली दुकानदारीची हत्या

प्रेमाला विरोध केला म्हणून, प्रियकराने केली दुकानदारीची हत्या

राकेशमुळे आपली प्रेयसी दुरावली आहे याचा राग आल्याने अखेर संधी साधत गणेश भोईर याने राकेशला संपवलं.

  • Share this:

प्रदीप भणगे, डोंबिवली 25 सप्टेंबर : डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे .पान टपरी चालकाने प्रेम संबंधाची टीप दिल्याने त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.पान टपरी चालक राकेश यादव यांच्या हत्ये प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी प्रियकारासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. डोंबिवली पश्चिमेतील मोठा गाव परिसरात बुधवारी पहाटे या परिसरात राहणारे राकेश यादव या इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. राकेश मोठा गाव परिसरात पान टपरी चालवत होता. त्याला माहीत पडले की त्याचं एका मित्राच्या मुलीसोबत गणेश भोईर या तरुणाचे प्रेम संबध सुरू आहे याची माहिती त्याने मुलीच्या वडिलांना दिली. मुलीच्या वडिलांनी मुलीला व तिच्या आईला गावाला पाठवून दिले त्याचा राग येऊन गणेशने आपल्या मित्रांच्या मदतीने राकेशची हत्या केली.

पत्नीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून होते आजोबा, सरपंचांनी दिला 'माणुसकीचा खांदा

राकेशमुळे आपली प्रेयसी दुरावली आहे याचा राग आल्याने अखेर संधी साधत गणेश भोईर याने आपले साथीदार, रवी खिल्लारे आणि एका अल्पवयीन मित्रा  सोबत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास राकेश ला गाठले. त्यांच्यात भांडण झालं आणि त्यांनी आपल्याकडे असलेल्या शस्त्राने त्याची हत्या केली. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गणेश भोईर, रवी खिल्लारे आणि अल्पवयीन तरुणाला विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

मध्य प्रदेशातल्या 'हनी ट्रॅप'चं 'हे' आहे महाराष्ट्र कनेक्शन, राजकारण्यांचा सहभाग

या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही तातडीने शोध घेऊन हत्यारांना अटक केली. आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार असून पोलीस सर्वच बाजूंनी त्याचा तपास करत आहेत. यात इतर कुठले धागेदोरे आहेत का याचीही चौकशी केलीय जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: love
First Published: Sep 25, 2019 10:12 PM IST

ताज्या बातम्या