Home /News /mumbai /

आर्यन खान तुरुंगाबाहेर, पण अरबाज- मुनमुन अजूनही तुरुंगातच; सुटकेसाठी प्रक्रिया सुरु

आर्यन खान तुरुंगाबाहेर, पण अरबाज- मुनमुन अजूनही तुरुंगातच; सुटकेसाठी प्रक्रिया सुरु

अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा (munmun dhamecha) हिला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे.

    मुंबई, 30 ऑक्टोबर: अखेर 26 दिवसांनंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आज तुरुंगाबाहेर आला आहे. गुरुवारी आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) जामीन मंजूर केला. यासोबतच अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धामेचा (munmun dhamecha) हिला देखील जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र आज आर्यन खानची सुटका झाली असली तरी दुसरीकडे मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात धावाधाव सुरु आहे. दोघं अजूनही तुरुंगाच्या बाहेर आलेले नाही आहेत. दोघांना जामीन मंजूर झाला असली तर दोघांची सुटका नियमांच्या कचाट्यात अडकली आहे. दोघांच्या सुटकेसाठी थोड्याच वेळात प्रक्रिया सुरू होणार आहे. या दोघांचेही वकील कोर्टात पोहोचून आवश्यक ती कार्यवाही करतील. त्यानंतर या दोघांची तुरुंगातून सुटका होईल. मात्र, या दोघांची आजच सुटका होणार की या दोघांना आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार याबाबत सांगता येत नाही आहे. हेही वाचा-  सावधान: लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका? अरबाजचे वडील अस्लम मर्चंट हे आपले वकील आणि जामीनदार यांना घेऊन कोर्टात दाखल झाले आहे. तर मुनमुन धामेचाचे वकील रवी सिंग आणि तिचा भाऊ प्रिन्स हे सुद्धा जामीनदार यांना घेऊन कोर्टात पोहोचलेत. अरबाज आणि मुनमुन यांनाही एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. Aryan Khan 26 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर 26 दिवसांनंतर आर्यन तुरुंगाबाहेर आला. 2 ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीवर टाकलेल्या छाप्यात आर्यन खानला अटक करण्यात आली होती. गुरुवारी आर्यन खानला मुंबई (Mumbai High Court) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर काल त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. मात्र जामिनाची प्रत तुरुंगात वेळेवर पोहोचली नसल्यानं आर्यनला रात्र तुरुंगात काढावी लागली. आज पहाटे 5.30 वाजता आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून जामीन पत्रपेटी उघडण्यात आली. जुही चावला जामीनदार गुरुवारी संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास अभिनेत्री जुही चावला आर्यनच्या जामीनासाठी जामीनदार म्हणून सेशन कोर्टात पोहोचली. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे देखील कोर्टात दाखल झाले होते. मानेशिंदे यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. यावेळी जुही चावला जामीनदार म्हणून कोर्टात हजर झाली. कोर्टात जुही चावलानं आपलं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर केलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. मात्र यावेळी जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडला. त्यामुळे जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाला. हेही वाचा- IPL 2022: आयपीएल टीमचा पुढचा प्लॅन तयार, यंगिस्तानवर देणार सर्वाधिक भर  आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन दरम्यान, मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला.आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे. एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये, मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aryan khan

    पुढील बातम्या