मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Aryan Khan तुरुंगातील संघर्षाचे 28 दिवस... क्रूझ, तुरुंग अखेर 'मन्नत' वर; अशी आहे संपूर्ण Timeline

Aryan Khan तुरुंगातील संघर्षाचे 28 दिवस... क्रूझ, तुरुंग अखेर 'मन्नत' वर; अशी आहे संपूर्ण Timeline

Aryan Khan: 2 ऑक्टोबर (आर्यनची अटक) ते 30 ऑक्टोबर (आर्यनची तुरुंगातून सुटका) या प्रकरणात काय आणि किती काय वळण आले ते जाणून घेऊया.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 30 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) 28 दिवसांनंतर त्याच्या घरी परतला आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB)आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर चाहत्यांनी मन्नतच्या (Mannat) बाहेर ढोल वाजवून, फटाके लावून आर्यनचे जल्लोषात स्वागत केलं. 2 ऑक्टोबर (आर्यनची अटक) ते 30 ऑक्टोबर (आर्यनची तुरुंगातून सुटका) या प्रकरणात काय आणि किती काय वळण आले ते जाणून घेऊया.

2 ऑक्टोबर

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीचा छापा मारला. या क्रूझवर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. पार्टी सुरू होण्यापूर्वीच आर्यन खान, अरबाज मर्चंटसह 8 जणांना एनसीबीने अटक केली होती. आर्यन खानसह सर्व आरोपींना 2 ऑक्टोबरची संपूर्ण रात्र कोठडीत ठेवण्यात आलं होतं.

3 ऑक्टोबर

आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एनसीबीने तिघांनाही अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी दिली.

4 ऑक्टोबर

आर्यनसह उर्वरित आरोपींना पुन्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं. एनसीबीने आर्यनच्या फोनवरून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, ड्रग्ज चॅटचे पुरावे सापडल्याचा दावा केला. न्यायालयानं सर्वांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवलं.

7 ऑक्टोबर

कोर्टानं आर्यनची आणि बाकीची पुढील कोठडी एनसीबीला देण्यास नकार दिला. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय देण्यात आला. आर्यन खानची त्याच दिवशी आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला.

8 ऑक्टोबर

मॅजिस्ट्रेट कोर्टानं आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

9 ऑक्टोबर

आर्यन खानच्या जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. एनसीबीने आर्यनकडून कोणतीही वसुली केलेली नाही, असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांनी केला. जी NCB नं ही मान्य केली.

हेही वाचा-  "हात जोडून विनंती करतो, बँकेच्या सभासदांची जिरवू नका, माझी जिरवायची असेल तर जिरवा" : उदयनराजे भोसले

 11 ऑक्टोबर

आर्यन खानच्या वकिलानं जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयाने NCBला 13 ऑक्टोबरला उत्तर दाखल करण्यास सांगितलं.

13 ऑक्टोबर

मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली.

14 ऑक्टोबर

मुंबई सत्र न्यायालयानं आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्या जामिनावरील निर्णय 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला आहे.

हेही वाचा-  मॉडेलचं ऑक्सिजन सिलेंडरसोबत बोल्ड फोटोशूट; लूक व्हायरल होताच भडकले लोक

 20 ऑक्टोबर

मुंबईच्या विशेष NDPS न्यायालयानं आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. तीन आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

21 ऑक्टोबर

शाहरुख खान पहिल्यांदाच तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. दोघांमध्ये 18 मिनिटे चर्चा झाली, ही भेट भावूक झाली. दोघे इंटरकॉमवर बोलत होते. दोघांमध्ये काचेची भिंत आणि ग्रील होती.

25 ऑक्टोबर

शाहरुख खाननंतर त्याची पत्नी गौरी खान आर्थर रोड जेलमध्ये मुलाला भेटायला गेली होती.

हेही वाचा-  T20 World Cup, IND vs NZ: पुन्हा तसंच घडलं तर....न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी विराटला सतावतेय भीती!

 26- 28 ऑक्टोबर

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी झाली. मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची केस लढवली.

28 ऑक्टोबर

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, त्यामुळे कारागृहातून बाहेर येण्यास उशीर झाला.

30 ऑक्टोबर

28 दिवसांच्या संघर्षानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. 28 दिवसांनंतर आर्यन खान त्याच्या घरी मन्नतला परतला. शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी आर्यनला तुरुंगातून घरी घेऊन गेला.

First published:

Tags: Aryan khan, NCB, Shah Rukh Khan