मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई ड्रग्ज प्रकरणानं वाढवल्या समीर वानखेडेंच्या अडचणी, 25 दिवसांत प्रकरणात असा झाला बदल

मुंबई ड्रग्ज प्रकरणानं वाढवल्या समीर वानखेडेंच्या अडचणी, 25 दिवसांत प्रकरणात असा झाला बदल

एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 29 ऑक्टोबर: Aryan Khan Drugs Case: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा (Mumbai Cruise Drugs Case) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळाला आहे. मात्र दुसरीकडे एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणी वाढत आहेत. स्वतःवर होणाऱ्या आरोप पाहता समीर वानखेडे यांनी न्यायालयाचा आश्रय घेतला आहे. दरम्यान न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे. मात्र आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या व्यक्तींच्या भूमिका गेल्या 25 दिवसांत कशा बदलल्या हे जाणून घेऊया.

समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा आरोप

आर्यन खान प्रकरणात इतके चढ-उतार आले आहेत की, चौकशीची वेळ तपास अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात काही उलडले झाले की वानखेडे यांच्यावर धर्म- जात तसंच वसुलीचे आरोप झाले. वसुलीच्या आरोपांनी घेरलेल्या वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलिस तपासाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर न्यायालयानं त्यांना दिलासा दिला. समीर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी किमान 3 दिवस आधी माहिती द्यावी, असं न्यायालयानं म्हटलं. त्यापूर्वी एनसीबीने समीर यांच्या चौकशीसाठी दक्षता पथक तयार केलं होतं. जे या प्रकरणातील प्रत्येक व्यक्तीचे जबाब घेत आहे, त्यात समीर वानखेडेंनी दक्षता टीमला निवेदन दिले आहे.

हेही वाचा- जामिनाची बातमी ऐकताच अशी होती आर्यन खानची पहिली Reaction

ड्रग माफिया काशिफशी समीरची मैत्री?

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्यावर दररोज नवीन आरोप करत आहेत. त्यांनी आता समीर यांच्या दाढीवाल्या मित्रासोबतच्या मैत्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या दाढीवाल्याचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी जोडताना समीर वानखेडे स्वतः ड्रग्ज सिंडिकेटमध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी आरोप केला की, त्या दाढीवाल्या व्यक्तीचं नाव काशिफ खान आहे आणि तो फॅशन टीव्हीचा इंडिया हेड आहे. क्रूझवरील पार्टीचं आयोजनही फॅशन टीव्हीनं केलं होतं आणि छापेमारीच्या वेळी काशिफ खान क्रूझवर उपस्थित होता. या आधारे नवाब मलिक समीर वानखेडेंचे छापे आणि हेतू यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मलिकांनी आरोप केला की, काशिफसोबत असलेल्या मैत्रीखातर समीर यांनी त्याला सोडून दिलं. जो या पार्टीचा आयोजक होता.

हेही वाचा-जगातील पहिलं Unisex Condom बाजारात, स्त्री-पुरुष दोघांनाही होणार फायदा

समीर वानखेडेंचे पहिल्या पत्नीचे वडिलांची प्रतिक्रिया

वानखेडे यांची पहिली पत्नीचे वडिल डॉ. जाहिद कुरेशी यांनी केलेल्या दाव्यामुळे समीर आणि त्यांच्या कुटुंब मुस्लिम असल्याचा दावा अधिक बळकट झाला आहे. समीर वानखेडे यांचे पहिले सासरे डॉ.जाहिद कुरेशी म्हणाले, समीर वानखेडे यांचे कुटुंब मुस्लिम आहे. कुटुंब मुस्लिम आहे हे मला आत्तापर्यंत माहित होते. मुस्लिम कुटुंब होतं म्हणून माझ्या मुलीचं लग्न झालं. तो हिंदू आहे हे मला माहित नव्हतं.

धर्म-जात खोटं सांगून नोकरी घेतल्याचा आरोप

समीर वानखेडे हा हिंदू आहे की मुस्लिम या प्रश्नावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र त्यांनी एससी कोट्यातून यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे धर्मासोबतच त्यांच्या जातीवरही प्रश्न निर्माण झालेत. कारण समीर मुस्लिम असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकत नाही. सध्या धर्म आणि जात या प्रकरणी चौकशी सुरू झाली नाही आहे.

हेही वाचा- कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी नवं औषध, Capsule नं होणार उपचार

साक्षीदार के पी गोसावीला अटक

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी केपी गोसावीला साक्षीदार बनवण्यात आले होते. केपी गोसावीचा आर्यन खानला पकडून घेऊन जाताना आणि आर्यन खानसोबतच सेल्फी व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतर किरण गोसावी फरार झाला होता. काल त्याला पुण्यात अटक करण्यात आली. त्याला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, ज्या प्रकरणात गोसावी यांना अटक करण्यात आली आहे, ते प्रकरण फसवणुकीचे आहे.

प्रभाकर साहिल

गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल यांनी केलेल्या आरोपानंतर एकच गोंधळ उडाला. जो आर्यनच्या अटकेच्या वेळी सक्रिय होता. प्रभाकरने न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे. समीर यांना तपास पथकातूनच काढून टाकण्याची मागणी प्रभाकर यांनी केली आहे.

First published:

Tags: NCB