• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Aryan Drug Case: शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी?, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Aryan Drug Case: शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी?, समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया

Aryan Drug Case: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी हे प्रभााकर साईल यांनी केलेले सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 ऑक्टोबर: काही वेळापूर्वी मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drugs Case)प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला. आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी सध्या फरार आहे. मात्र किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी हे प्रभााकर साईल यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले की, मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईल. हेही वाचा- ठरला शेवटचा Birthday, ड्रग्स माफियांच्या गोळीबारात भारतीय महिलेची हत्या  प्रभाकर साईल यांचे आरोप प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात 18 कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे. हेही वाचा- समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे. हेही वाचा- India vs Pakistan: पाकिस्तानच्या मॅचपूर्वी धोनीला मिळाली खराब खेळण्याची ऑफर! VIDEO आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published: