मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Aryan Khan case : आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी स्थगित, उद्या होणार फैसला

Aryan Khan case : आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी स्थगित, उद्या होणार फैसला

'आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही'

'आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही'

'आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 26 ऑक्टोबर : मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी गेल्या 20 दिवसांपासून कोठडीत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा (sharukh khan)चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan arrest case) च्या जामीन अर्जावर आज मुंबई कोर्टात (mumbai high court) जोरदार युक्तीवाद झाला. मुंबई हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला असून सुनावणी उद्यावर ढकलली आहे. त्यामुळे आर्यनचा आजचा मुक्काम हा जेलमध्येच राहणार आहे.

आर्यन खान प्रकरणी मुंबई हायकोर्टात जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी  भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची बाजू मांडली. कोर्टात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे सुनावणीसाठी अडथळा आला होता. न्यायमूर्तीला सुनावणी थांबवावी लागली होती. त्यानंतर पोलिसांनी कोर्टातली गर्दी कमी केली. त्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली. वरीष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानच्या बाजू मांडत जोरदार युक्तीवाद केला.

नोव्हेंबर महिन्यात 17 दिवस बंद राहणार बँका, लवकर पूर्ण करा तुमची कामं

'आर्यन सध्या 23 वर्षाचा आहे. तो कैलिफोर्नियात शिकतो. तो क्रुझवरून गोव्याला जात होता. त्यानं तिकीट काढलेलं नव्हतं, त्याला आमंत्रण दिलं गेलं होतं. क्रुझवर एका कार्यक्रमासाठी तो पाहुणा म्हणून आला होता. त्याचा मित्र अरबाझ मर्चंटसोबत जात होता. एनसीबीकडे आधीपासूनच माहिती होती की या क्रुझवर अमली पदार्थ नेले जाणार आहेत. अरबाझच्या बुटात काही प्रमाणात अमली पदार्थ सापडले. मात्र आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही. त्यामुळे आर्यनला पकडण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र पोलिसांची आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करत आर्यनला अटक केली.

आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही. त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही. तोफान सिंग प्रकरणाची रोहतगी यांच्याकडून कोर्टात उल्लेख केला.

तसंच, आर्यनची कोणतीही वैद्यकीय चाचणी झालेली नाही, त्यामुळे आर्यनचा या अंमली पदार्थांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही. केवळ मित्राच्या बुटात काही सापडलं म्हणून आर्यनला कसं जबाबदार धरता येईल? असा सवाल रोहतगींनी उपस्थितीत केला.

एनडीपीएस कायद्यात अंमली पदार्थ्यांच्या मात्रेलाही महत्व आहे. आर्यनकडे तर काहीच सापडलेलं नाही मग त्याच्यावर या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला. आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सअपचा संदर्भ जोडला आहे या चॅटमधनं काहीही सिद्ध होत नाही. एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.

आई कुठे काय करते :अनिरूद्धच्या निर्णयामुळे देशमुखांच्या घराचे होणार दोन भाग ?

एका पंचाचा कर्मचारी असलेल्या दुसऱ्या पंचानं इथल्या एनसीबी प्रमुखांवर गंभीर केलेत एका राजकीय नेत्याच्या जावयाशी हे सारं प्रकरण आणि आरोप प्रत्यारोप संबंधित आहेत मात्र आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असंही रोहतगी यांनी स्पष्ट केलं.

जर आर्यनचा मोबाईल जप्त केला नाही तर मग व्हाटसप चॅट कोणत्या आधारावर NCB दाखवत आहे. आता यापूर्वीचे काही संदर्भ जोडून आर्यन अमली पदार्थांचं सेवन करतो हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र त्यामुळे या घटनेत आर्यन आणि अमली पदार्थांचा संदर्भ कसा जोडता येईल ? असा थेट सवाल रोहतगींनी उपस्थितीत केला.

ज्यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपांत पकडलेलं नाही त्यांना अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागवणं चुकीचं आहे. एनडीपीएस कायद्यातही स्पष्ट केलंय की, ड्रग्जच्या आहारी गेलेल्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी त्यांना जेलऐवजी पुनर्वसन केंद्रात पाठवलं जाते, असंही रोहतगी म्हणाले.

आर्यनचा या हस्तगत केलेल्या अंमली पदार्थांशी काहीही संबंध नाही त्याचा या खरेदीतही कुठे संबंध असल्याचे पुरावे नाहीत, त्यानं यासाठी कुणालाही पैसे दिलेले नाहीत जर कमी प्रमाणात अंमली पदार्थ सापडले असतील तर त्या आरोपीला जेलमध्ये टाकलं जात नाही, त्याला सुधारण्याची संधी दिली जाते इथे तर आर्यनकडे काहीच सापडलेलं नाही तरीही आर्यन 20 दिवसांपासून तुरूंगात आहे, असंही रोहतगी म्हणाले.

रिलायन्स-बीपी मोबिलिटी लिमिटेडचं पहिलं मोबिलिटी स्टेशन नवी मुंबईत सुरू

आर्यनविरोधात एनसीबीची सारी केस ही केवळ शक्यता आणि अंदाजांवर अवलंबून आहे तो यांच्यासोबत होता, म्हणून तोही अमली पदार्थ घेणार होता हा दावाच गुणवत्तेच्या आधारावर सिद्ध होत नाही, असंही रोहतगी यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि या केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालांचं वाचन केलं.

तर अमित देसाई  यांनी अचित आणि आर्यनमधील जे एनसीबीने चॅटचे पुरावे म्हणून वापरले ते चॅट हे पोकर गेम बद्दल आहे, अंमली पदार्थांबद्दल नाही, असा दावा केला आहे.

First published: