मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

जामीन मिळाल्यानंतरही तुरुंगात आहे आर्यन खान, 5 वाजेपर्यंत करावी लागेल प्रक्रिया नाहीतर आजची रात्रही काढावी लागेल तुरुंगात

जामीन मिळाल्यानंतरही तुरुंगात आहे आर्यन खान, 5 वाजेपर्यंत करावी लागेल प्रक्रिया नाहीतर आजची रात्रही काढावी लागेल तुरुंगात

आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी सुरू झाली आहे.

आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी सुरू झाली आहे.

आर्यन खानच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी सुरू झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 29 ऑक्टोबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Bollywood actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) जामीन मंजूर केला. आता त्याच्या सुटकेची प्रक्रिया आज म्हणजेच शुक्रवारी सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर आर्यनला आजची रात्रही तुरुंगात काढावी लागेल आणि त्यानंतर उद्या सकाळी त्याची सुटका होईल.

तज्ज्ञांच्या मते, मुंबई उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत (डिटेल्ड ऑर्डर कॉपी या ऑपरेटिव पार्ट) विशेष एनडीपीएस न्यायालयात जमा करावी लागते. विशेष एनडीपीएस न्यायालय आरोपीच्या नावाने जामीन रक्कम किंवा सुरक्षिततेसाठी वैयक्तिक बाँड तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे सादर केल्यानंतर 'रिलीज ऑर्डर' जारी करते. ही रिलीज ऑर्डर आर्थर रोड कारागृहाबाहेरील जामीन पेटीत ठेवण्यात येतो.

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण करावी लागेल प्रक्रिया

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करुन रिलीज ऑर्डर जामीन पेटीत टाकल्यास संध्याकाळी 7- 8 वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येऊ शकतो. या बॉक्समधून निघालेल्या रिलीझ ऑर्डरच्या आधारे तुरुंग अधिकारी आरोपींना सोडण्याची प्रक्रिया सुरू करतात. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आरोपीला सोडून दिलं जातं.

हेही वाचा-  समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, 25 दिवसांत असा बदलला प्रकरणाचा फासा

आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले की, आम्हाला आशा आहे की आम्हाला उच्च न्यायालयाकडून आजच आदेश आणि रजिस्ट्रीची प्रत मिळेल. आदेशाची प्रत मिळताच आम्ही ती एनडीपीएस न्यायालयात सादर करू. यासोबतच इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आर्यनला खानच्या सुटकेचे आदेश मिळतील. आर्यन खान आज संध्याकाळपर्यंत तुरुंगातून बाहेर येईल, अशी आशा सतीश मानशिंदे व्यक्त केली.

जामीन मिळाल्याचं वृत्त ऐकताच आर्यन खाननं अशी दिली Reaction

आर्यन खानला संध्याकाळी 6 वाजता जेवण देताना जामीन मिळाल्याची माहिती मिळाली. त्यावर आर्यन हसला आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आर्यनला जामिनाची बातमी मिळाल्यावर तो खूप खूश (very happy) झाला. कारागृह प्रक्रियेस एक, दोन किंवा अर्धा तास लागतो. आर्यन खाननं रात्री उशीरापर्यंत जेवण केलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खाननं त्याच्या बॅरेकमधील काही कैद्यांशी ओळख केली होती. आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी कळताच तो त्या कैद्यांकडे गेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आणि सुरु असलेल्या प्रकरणांमध्ये मदत करण्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचा- जगातील पहिलं Unisex Condom बाजारात, स्त्री-पुरुष दोघांनाही होणार फायदा

सलग तीन दिवस आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन देण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतरच आर्यन, अरबाज, मुनमुन तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहेत. तिघंही शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून सुटू शकतील. आर्यन खानच्या वकिलांना तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर स्टारकिडला जामीन मिळवून देण्यात यश आलं आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज दोनदा फेटाळला होता.

First published:

Tags: Aryan khan