मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

aryan khan bail : आर्यन खानची थोड्याच वेळात जेलमधून सुटका, पण 'या' अटींचं करावं लागेल पालन

aryan khan bail : आर्यन खानची थोड्याच वेळात जेलमधून सुटका, पण 'या' अटींचं करावं लागेल पालन

आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 ऑक्टोबर : क्रुझ ड्रग्स प्रकरणी अखेर आर्यन खानला  (Aryan Khan) जामीन मंजूर झाला आहे. आज त्यांची आर्थर रोड कारागृहात सुटका करण्यात येणार आहे. आर्यनला अटी शर्तीसह 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) जामीन मंजूर केला आहे. तसंच दर शुक्रवारी एनसीबी (ncb) कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गेल्या 25 दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात असलेल्या आर्यन खानसह तिघांची जामिनावर सुटका झाली आहे. मुंबई हायकोर्टाने आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरू होता. अखेरीस आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. एनसीबीने जामीन देण्यास कडाडून विरोध केला खरा पण त्यांच्या युक्तीवाद सपशेल अपयशी ठरला.

महाराष्ट्र डाक विभाग भरती: 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी तब्बल 257 जागा रिक्त

आर्थर रोड कारागृहाच्या निरीक्षकांना हायकोर्टाची ऑर्डर मिळाली आहे. त्यानुसार आता आर्यनसही तिघांची जामिनीवर सुटका होणार आहे. जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावे लागणार आहे.

Rakesh Jhujhunwala यांच्या पोर्टफोलिओतील 'या' स्टॉकमध्ये आज 10 टक्के वाढ

एकूण 5 पानांचे ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये,  मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे.

त्याचबरोबर ncb ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.

First published: