मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Aryan Drug Case : 25 कोटी खंडणीच्या आरोपावर NCB चा खुलासा, पत्र केले प्रसिद्ध

Aryan Drug Case : 25 कोटी खंडणीच्या आरोपावर NCB चा खुलासा, पत्र केले प्रसिद्ध

समिर वानखेडे (sameer wankhede) यांनी पंच प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

मुंबई, 24 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (Aryan Khan) प्रकरणाला आज धक्कादायक वळण मिळाले. या प्रकरणातील एका पंचाने आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर पुन्हा एकदा एनसीबीला (ncb) खुलासा करावा लागला आहे. समिर वानखेडे (sameer wankhede) यांनी पंच प्रभाकर साईलचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

एनसीबीने एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपावर खुलासा केला आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातला साक्षीदार आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे बोलणे योग्य नाही. त्याला जर या प्रकरणाची आणखी काही माहिती असेल तर न्यायालयात द्यावी, असा खुलासा एनसीबीचे डीडीजी अशोक जैन यांनी केला आहे.

तसंच, प्रभाकर साईल याने केले सर्व आरोप हे समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहे, असंही या पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रभाकर साईलने काय केले आरोप

प्रभाकर साईल याने NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे.

प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं.

T20 World Cup : India जिंकणार का Pakistan? ज्योतिषी जगन्नाथ गुरूजींची भविष्यवाणी

क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.

आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

First published: