मुंबई, 24 मे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारवर टीका केली. मोदी सरकारने आम्हा सर्वांची शक्ती काढून घेतली. ज्या दिवशी निकाल आला त्याच्या 8 दिवसात अध्यादेश जारी केला आणि अधिकार काढून घेण्यात आले. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही असाच त्याचा अर्थ होतो असं केजरीवाल म्हणाले.
सर्वोच्च न्यायालय काहीही निर्णय देऊदेत आम्ही मानणार नाही असा त्यांचा स्वभाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना शिव्या दिल्या जातात आणि त्यांच्याविरोधात मोहिम चालवली जाते असंही केजरीवाल यांनी म्हटलं.
महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरीनंतर घडलेल्या घडामोडींबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, शिवसेना सगळ्यात जास्त सहन करत आहे. सीबीआय, ईडी चा वापर करून बहुमत, लोकांचं सरकार त्यांनी पाडलं. जर सरकार बनलं नाही तर मग आमदार तोडायचे, अध्यादेश काढायचे हाच प्रयत्न आहे. शिवसेनेने आम्हाला वचन दिलं आहे संसदेत जेव्हा हा मुद्दा येईल तेव्हा ते आम्हाला समर्थन देतील.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार; फडणवीसांची भेट घेतलेल्या नेत्याचं वक्तव्य
अध्यादेश काढून त्यांनी आमच्या शक्ती काढून घेतल्या. हा अहंकार आहे आणि त्याचा परिणाम आहे. पंजाब मध्ये बजेट सेशन होणार नाही असं राज्यपाल यांनी सांगितलं. असं असेल तर केवळ प्रधानमंत्री आणि राज्यपाल बसवा अशा शब्दात केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, लोकशाही संकटात असून इलेक्टेडच्या जागी सिलेक्टेड लोक आहे. आपल्या मर्जितला राज्यपाल निवडा आणि बसवा. राजभवन भाजपचे हेडऑफिस बनले आहेत आणि भाजप नेते अधिकारी बनले आहेत. आम्हीच राज्य करू असाच अविर्भाव त्यांचा आहे
देश वाचवायला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. 2024 मध्ये जर हे आले तर संविधान बदलतील. आता ज्या प्रकारे मोदीजी वागत आहेत. 24 मध्ये आल्यावर ते घोषणा करतील पुढची 40 वर्ष मीच राहणार अशी टीकाही भगवंत मान यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Arvind kejriwal, Uddhav Thackeray