राणेंवरच्या पोस्टरबाजीमुळे अरविंद भोसले गोत्यात

राणेंवरच्या पोस्टरबाजीमुळे अरविंद भोसले गोत्यात

अरविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई,26 सप्टेंबर: नारायण राणेंविरुद्ध पोस्टरबाजी केल्यामुळे शिवसेनेचे नेते अरविंद भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा वरळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

काल शिवसेनेनं नारायण राणेंची खिल्ली उडवणारं होर्डींग व्हायरल केलं होतं. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  मुंबईतल्या वरळी नाक्यावर नारायण राणेंवर टीका करणारं वादग्रस्त आणि तितकंच आक्षेपार्ह असं होर्डिंग लावलं होतं. या पोस्टरमध्ये आक्षेपार्ह भाषेत राणेंवर टीका करण्यात आल्याचा आरोप  झाला होता. हे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर राणे समर्थक आणि शिवसेनेमध्ये त्यामुळे मोठा संघर्ष रस्त्यावर पाहायला मिळाला होता. तसाच सोशल मीडियावरही हा संघर्ष बराच रंगला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 11:43 AM IST

ताज्या बातम्या