S M L

'सिंहासन'कार अरूण साधू काळाच्या पडद्याआड

काल संध्याकाळी त्यांना सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रात्रभर उपचार सुरू होते.पहाटे त्यांचं निधन झालं.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 25, 2017 03:48 PM IST

'सिंहासन'कार अरूण साधू काळाच्या पडद्याआड

मुंबई,25 सप्टेंबर: मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांनी सायन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

काल संध्याकाळी त्यांना सायन रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर रात्रभर उपचार सुरू होते.पहाटे त्यांचं निधन झालं.साधू यांनी देहदान केलं असल्यामुळे त्यांच्या पार्थिवावर कुठलेही अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत.7.30-8 पर्यंत त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले.त्यानंतर अंत्यदर्शनासाठी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात येईल.12 वाजेपर्यंत देहदान करण्यात येणार आहे.

साधू यांचे पत्रकारितेत अत्यंत आदराने नाव घेतले जाते.केसरी, माणूस, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया आणि स्टेट्समनसाठी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले.

पत्रकार असतानाच एक लेखक म्हणूनही साधूही प्रसिद्ध झाले. साधू यांनी भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक असे समाजाभिमुख लेखन केले. कथा, कादंबऱ्या, ललित लेखन, समीक्षण, नाटक, शैक्षणिक, भारतातील समकालीन इतिहास अशा अनेक विषयांवर त्यांनी मुक्त लेखन केले. कादंबऱ्यामधून सिंहासन, झिपऱ्या, तडजोड, त्रिशंकू, बहिष्कृत, मुखवटा, मुंबई दिनांक, विल्पवा, शापित, शुभमंगल, आणि स्फोट ही विज्ञान कादंबरी या सर्वच कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. तर कथासंग्रहांमधून एक माणूस उडतो, कथा युगभानाची, ग्लानिर्भवति भारत, बिनपावसाचा दिवस, बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती, मंत्रजागर, मुक्ती अशा त्यांच्या कथा खूप गाजल्या.

ललित लेखनात अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, सहकारधुरीण आणि नाटक लेखनात पडघम तर समकालीन इतिहासात ड्रॅगन जागा झाला, जेव्हा ड्रॅगन जागा होतो, फिडेल आणि क्रांती असे दीर्घलेखन केले. 80 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. तसंच कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा जनस्थान पुरस्कारही त्यांना मिळाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 08:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close