अरुण गवळींची मुलगी भायखळ्यात शिवसेनेला देणार का धक्का?

याच मतदारसंघातून अखिल भारतीय सेनेचे संस्थापक गँगस्टर अरुण गवळी एकदा निवडून आले होते.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2019 03:50 PM IST

अरुण गवळींची मुलगी भायखळ्यात शिवसेनेला देणार का धक्का?

मुंबई 02 ऑक्टोंबर : उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यावर सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरी उफाळून आलीय. शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबईतही ज्यांना तिकीट मिळालं नाही ते नाराज आहेत. तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेनं भायखळा हा मतदार संघ न सोडल्यामुळे नाराजी व्यक्त केलीय. याच मतदारसंघातून अखिल भारतीय सेनेचे संस्थापक  गँगस्टर अरुण गवळी एकदा निवडून आले होते. त्यांच्या कन्या गिता गवळी याच भागातून नगरसेविका आहेत. त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला आपण प्रत्येक वेळी मदत केली. त्यांनी यावेळी हा मतदारसंघ सोडला असता तर चांगलं झालं असतं असंही त्या म्हणाल्या. गिता गवळी या आपल्या पक्षाकडून भायखळ्यातून निवडणूक लढविणार आहेत.

आदित्य ठाकरेंना वरळीतून आघाडीचा 'हा' नेता देणार थेट आव्हान!

गिता गवळी म्हणाल्या, शिवसेना आणि आम्ही महापालिकेत मित्र आहोत. मला लढण्याची इच्छा आहे. मी तिसऱ्यांदा उभी राहातेय.  त्यांना जेंव्हा जेंव्हा मदत हवी होती तेंव्हा आम्ही त्यांना मदत केलीय. आता खरतर त्यांनी मला मदत करायला हवी होती. यावेळी शिवसेनेनें यामिनी जाधव यांना भायखळ्यातून उमेदवारी दिलीय. यामिनी या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी आहेत.

गेल्या वेळी मी खूप कमी मतांने हरले होते. त्यावेळी सेनेनं मदत केली असती तर मी जिंकले असते. इथं सगळेच नवे आहेत. यामिनी जाधव पहिल्यांदा विधानसभा लढणार आहेत. रईस शेख नवे आहेत. काँग्रेसे मधू चव्हाण जुने असले तरी त्यांनी विशेष काही केलं नाही त्यामुळे लोक मला निवडून देतील याची खात्री आहे असंही गिता गवळींनी सांगितलं.

उदयनराजेंविरोधात लढलेल्या नरेंद्र पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी भूमिका केली स्पष्ट

Loading...

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सेना-भाजपमध्ये राडा

मागाठाणेची जागा शिवसेनेला सुटल्यानं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच शिवसेनेकडून भाजपला हिणवणारं कार्टुन व्हायरल झालं आहे. त्यामुळं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात शक्तीप्रदर्शन केलं आहे. मागाठाणेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ ही अशी घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे बोरिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भाजपच्या वाट्याला असलेल्या मागाठाणे मतदारसंघ शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांना मिळाल्यानं भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातच व्हायरल झालेल्या ह्या कार्टुननं आगीत तेल ओतण्याचं काम केलं.

मागाठाणे मतदारसंघ शिवसेनेचा असल्याचं सांगून शिवसेनेनं भाजपला कार्टुनमधून हिणवलं. शिवसेना नगरसेविका भोईर यांच्या पतीनं हे कार्टुन काढून व्हायरल केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यामुळं युतीचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचा फॉर्म भरण्यासाठी दरेकरांनी जावू नये यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीली हा असा घेरावा घातल्याचं पाहायाला मिळलं. प्रवीण दरेकरांनी ही उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याचे संकेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...