Home /News /mumbai /

मुंबईमध्ये आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह

मुंबईमध्ये आणखी एका प्रसिद्ध कलाकाराची आत्महत्या, बाथटबमध्ये सापडला मृतदेह

प्रसिद्ध कलाकार आणि फोटोग्राफर राम इंद्रनील कामतने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले आहे. तो 41 वर्षांचा होता.

  मुंबई, 20 ऑगस्ट : प्रसिद्ध कलाकार आणि फोटोग्राफर राम इंद्रनील कामतने आत्महत्या करून त्याचे जीवन संपवले आहे. तो 41 वर्षांचा होता. मुंबईतील माटुंगा याठिकाणी बाथटबमध्ये रामचा मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मीडिया अहवालांच्या मते, राम गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता आणि लॉकडाऊन काळात ही परिस्थिती आणखी बिघडत गेली. पोलिसांना त्याच्या घरी एक सुसाइड नोट मिळाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. राम इंद्रनील कामतच्या (Ram Indranil Kamath) आत्महत्येनंतर मिळालेल्या सुसाइड नोटनुसार, या घटनेसाठी त्याने कुणालाही जबाबदार धरले नाही आहे. सध्या पोलीस त्याचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. राम मुंबईत त्याच्या आईबरोबर राहत असे.
  View this post on Instagram

  When I’m in a good mood I let him click pics. #puppylove #babylove

  A post shared by Ram Indranil Kamath (@instahindu) on

  प्रोफेशनली तो एक चित्रकार होता त्याचबरोबर फोटोग्राफी देखील करत असे. राम एक मायथॉलॉजिस्ट होता असून तो स्वत:ला देवी महालक्ष्मीचा सर्वात आवडता मुलगा म्हणवून घेत असे. त्याची ग्लासवर्क पेंटिंग मुंबईतील आर्ट सर्किटमध्ये विशेष प्रसिद्ध होती. या घटनेनंतर त्याचे कुटुंबीय धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत पण ही घटना त्यांच्यासाठी अनाकलनीय होती. (हे वाचा-सुशांत मृत्यू प्रकरणाचा हे 4 अधिकारी करणार तपास; CBI ने SIT टीम केली जाहीर) कोरोना काळात अनेक कलाकारांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. अभिनेत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने तर संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे. प्राथमिक पोस्ट मार्टम अहवालानुसार त्याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपावण्यात आला आहे. त्यानंतर टीव्ही विश्वातील आणखी अभिनेता - समीर शर्मा याने देखील आत्महत्येचा पर्याय निवडला. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. एकंदरित कलाविश्वातील अनेक मोहऱ्यांना यावर्षी आपण गमावले आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  पुढील बातम्या