लोकलमध्ये मुलीनं घेतला जन्म

लोकलमध्ये मुलीनं घेतला जन्म

  • Share this:

Image img_194252_local_240x180.jpg03 ऑगस्ट : वसई रोड स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये एका नवजात मुलीनं जन्म घेतला. विरारहून 6.18 वाजता सुटलेल्या ट्रेनमध्ये नालासोपाराच्या वालईपाडा येथे राहणारी पूनम सिंग ही गरोदर महिला चढली. मात्र नालासोपारा इथं येताच तिच्या प्रसुती वेदना सुरू झाल्या.

तिच्यासोबत तिची आई होती मात्र या प्रसंगाला कसं सामोरं जायचं हे दोघीनाही कळेनासं झालं. वसई स्टेशनमध्ये गाडी थांबली आणि महिलांनी गाडीची साखळी ओढून ट्रेन स्टेशनमध्येच थांबवली. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनची प्रसुती करणारी रानी बेबी ही नर्सही सुदैवानं याच ट्रेनमध्ये होती.

रोशनी भुवड, अश्विनी खानविलकर या नर्स ही या ट्रेनमध्ये प्रवास करत होत्या. त्यांनी पूनमला मदत केली. पूनमला मुलगी झाली आणि बाळासहित पूनमही सुखरूप आहे. ती आता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2013 06:19 PM IST

ताज्या बातम्या