म्हाडाची घरं स्वस्त करावीत 'दादां'ची मागणी

म्हाडाची घरं स्वस्त करावीत 'दादां'ची मागणी

02 मेमुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती जास्त असून घरांच्या किंमती कमी करण्याकडे मुख्यंमत्र्यांनी लक्षं द्यावं अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. म्हाडा हे ज्या खात्याच्या अंतर्गत येतं ते गृहनिर्माण खातं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं. सर्वसामान्यांना मुंबईत घर मिळवण्यासाठी म्हाडाची घरं हाच आधार असतो. म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमतींमुळे लोक आधीच नाराज आहे. तसंच म्हाडाचं सभापतीपद अद्यापही रिक्त आहे. या सगळ्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच अजित पवारांनी म्हाडाच्या घरांचा मुद्यावर वक्तव्य केलं असल्यांचं मानलं जातं आहे. यंदा म्हाडाच्या 1 हजार 259 घरांसाठी सोडत निघणार आहे. एक मेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवातही झाली आहे. यावर्षीच्या घरांच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सुमारे साडेसहा लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती असणार आहेत. मुंबईत तुंगा गाव पवई, पवई एमएचपी, मालवणी मालाड, चारकोप, शिंपोली बोरिवली, मागाठणे बोरीवली, शैलेंद्रनगर दहिसर, प्रतीक्षा नगर सायन, विनोबा भावे नगर कुर्ला, आणि तुर्भे मंडाले याठिकाणी ही घरं असणार आहेत.मात्र म्हाडाची घरं खासगी बिल्डरांच्या बरोबरीनं महाग झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली. याच मुद्यावरून आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

  • Share this:

02 मे

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किंमती जास्त असून घरांच्या किंमती कमी करण्याकडे मुख्यंमत्र्यांनी लक्षं द्यावं अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. म्हाडा हे ज्या खात्याच्या अंतर्गत येतं ते गृहनिर्माण खातं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतं. सर्वसामान्यांना मुंबईत घर मिळवण्यासाठी म्हाडाची घरं हाच आधार असतो. म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किंमतींमुळे लोक आधीच नाराज आहे. तसंच म्हाडाचं सभापतीपद अद्यापही रिक्त आहे. या सगळ्या मुद्यांवर मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठीच अजित पवारांनी म्हाडाच्या घरांचा मुद्यावर वक्तव्य केलं असल्यांचं मानलं जातं आहे.

यंदा म्हाडाच्या 1 हजार 259 घरांसाठी सोडत निघणार आहे. एक मेपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवातही झाली आहे. यावर्षीच्या घरांच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सुमारे साडेसहा लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत घरांच्या किमती असणार आहेत. मुंबईत तुंगा गाव पवई, पवई एमएचपी, मालवणी मालाड, चारकोप, शिंपोली बोरिवली, मागाठणे बोरीवली, शैलेंद्रनगर दहिसर, प्रतीक्षा नगर सायन, विनोबा भावे नगर कुर्ला, आणि तुर्भे मंडाले याठिकाणी ही घरं असणार आहेत.मात्र म्हाडाची घरं खासगी बिल्डरांच्या बरोबरीनं महाग झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली. याच मुद्यावरून आता अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2013 01:22 PM IST

ताज्या बातम्या