मारहाण प्रकरणी पप्पू कलानींना अटक आणि जामीन

मारहाण प्रकरणी पप्पू कलानींना अटक आणि जामीन

09 एप्रिलउल्हासनगरचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक पप्पू कलानी यांना पाच हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळालाय. उल्हासनगर महानगर पालिकेच्या दोन सहाय्यक उपायुक्तांना पोलीस ठाण्याजवळ मारहाण केल्याप्रकरणी कलानी यांना अटक करण्यात आली होती. कलानी आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात काल रात्री उशीरा उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन महापालिका अधिकार्‍यांनी आपल्याकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार पप्पू कलानीचा समर्थक असलेल्या एका बिल्डरनं दाखल केलीय. सहाय्यक आयुक्त सागर घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय असलेले बांधकाम तोडले आहे. या प्रकारामुळं पप्‌ू कलानी आणि त्यंाच्या पत्नी संतापले होते. उलट हे दोन अधिकारी भ्रष्ट असून ते दोन लाखांची खंडणी मागत असल्याचा प्रतिआरोप कलानींनी केलाय.पप्पू कलानींनी यापूर्वीही पालिका अधिकारी दीपक ढोले यांनाही याच प्रकारे मारहाण केली होती. ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातल्या अनधिकृत बांधकामांचा विषय जोरात सुरू असताना आता उल्हासनगरातल्या या प्रकरणाची भर पडलीय. ठाण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील यांच्या विरोधात पक्षानं निलंबनाची कारवाई केली. आता पप्पू कलानींप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती भुमिका घेणार आहे याकडं सर्वाचं लक्ष लागलंय.

  • Share this:

09 एप्रिल

उल्हासनगरचे माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक पप्पू कलानी यांना पाच हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळालाय. उल्हासनगर महानगर पालिकेच्या दोन सहाय्यक उपायुक्तांना पोलीस ठाण्याजवळ मारहाण केल्याप्रकरणी कलानी यांना अटक करण्यात आली होती. कलानी आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात काल रात्री उशीरा उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन महापालिका अधिकार्‍यांनी आपल्याकडे दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार पप्पू कलानीचा समर्थक असलेल्या एका बिल्डरनं दाखल केलीय.

सहाय्यक आयुक्त सागर घोलप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालय असलेले बांधकाम तोडले आहे. या प्रकारामुळं पप्‌ू कलानी आणि त्यंाच्या पत्नी संतापले होते. उलट हे दोन अधिकारी भ्रष्ट असून ते दोन लाखांची खंडणी मागत असल्याचा प्रतिआरोप कलानींनी केलाय.पप्पू कलानींनी यापूर्वीही पालिका अधिकारी दीपक ढोले यांनाही याच प्रकारे मारहाण केली होती. ठाण्यातल्या मुंब्रा परिसरातल्या अनधिकृत बांधकामांचा विषय जोरात सुरू असताना आता उल्हासनगरातल्या या प्रकरणाची भर पडलीय. ठाण्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील यांच्या विरोधात पक्षानं निलंबनाची कारवाई केली. आता पप्पू कलानींप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणती भुमिका घेणार आहे याकडं सर्वाचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 9, 2013 09:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...