माहीम दुर्घटनेनंतर 147 इमारतींविरोधात कारवाई सुरू

माहीम दुर्घटनेनंतर 147 इमारतींविरोधात कारवाई सुरू

  • Share this:

domibiwaliमुंबई 12 जून : माहीममध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाग आली आहे. महापालिकेने आता धोकादायक इमारतींवर कारवाई करायला सुरवात केली आहे. पालिकेनं आज कृष्णा इमारतीवर हातोडा मारला. कल्याण डोंबिवलीत शहरात 642 धोकादायक इमाारती आहेत.

त्यापैकी 147 अती धोकादायक इमारती पाडण्याचं काम पालिकनं हाती घेतलं आहे. मुंब्रापाठोपाठ पावसाळ्याच्या सुरूवातीलाच माहिमची इमारत कोसळल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. दरवर्षी धोकादायक इमारतींना फक्त नोटिसा पाठवण्या व्यतिरिक्त पालिका प्रशासन काहीच करत नसल्याचा आरोप नागरिक करत आहे. आज पालिकेनं मोठ्या धडाक्यात कारवाई सुरु केली खरी, पण ही कारवाई अशीच सुरु राहिल का याबाबत नागरिकांच्या मनात शंका आहे.

First published: June 13, 2013, 2:19 PM IST

ताज्या बातम्या