म.टा. पुरस्कारांवर आयबीएन लोकमतचा ठसा

म.टा. पुरस्कारांवर आयबीएन लोकमतचा ठसा

10 मार्चआयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. यंदा म.टा.सन्मान 2012 मध्ये आयबीएन लोकमतने आपली घोडदौड कायम ठेवली आहेत. म.टा.सन्मानमध्ये कथाबाह्य मालिका, वृत्तविषयक कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट सुत्रधार पुरुष,स्त्री आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना गटात आयबीएन लोकमतने आठ पैकी सात पुरस्कार पटकावले. म.टा. सन्मान सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार रिपोर्ताज या कार्यक्रमाने पटकावला. तर सर्वोत्कृष्ट स्त्रिसुत्रधार म्हणून रेणुका रामचंद्रन तर सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधार पुरस्कार राजेंद्र हुंजे यांना मिळाला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही म.टा.सन्मान 2012 मोठ्या थाटात पार पडला. मुंबईतील अंधेरी येथील ग्रँड मराठा या पंचतारीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी आयबीएन लोकमतने पुरस्कारात बाजी मारली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार 'रिपोर्ताज' या कार्यक्रमाला मिळाला. त्याचबरोबर नकुसा मुलींना प्रकाशझोतात आणणार्‍या प्राजक्ता धुळप यांच्या संकल्पनेला सर्वोत्कृष्ट संकल्पना पुरस्कार मिळाला. सातार्‍यातील 222 नकुसा म्हणजेच नकोश्या असलेल्या मुलींची नाव नकोशी ठेवण्यात आली. याला वाचा फोडत आयबीएन लोकमतने या 222 नुकसा मुलींची करुण कथा 'रिपोर्ताज' च्या माध्यमातून महाराष्ट्रापुढे आणली. राज्य सरकारने यांची दखल घेत सर्व नकुसा मुलींचे महिन्याभरात नामकरण करुन 'हव्याश्या' केल्या. तसेच सर्वोत्कृष्ट मुं.टा. युवा मालिकेचा पुरस्कार 'आम्ही दुर्गा' या कार्यक्रमाला मिळाला. आपल्या कार्यचा ठसा उमटवणार्‍या 'सावित्रीच्या लेकी' 'आम्ही दुर्गा'च्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना भेटीला आल्यात. याचीच ही पोच पावती आयबीएन लोकमतला या पुरस्कारच्या माध्यमातून मिळाली. तसेच युवा कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट स्त्री सुत्रधाराचा पुरस्कार प्रियंका देसाई हिला मिळाला. तर दररोज रात्री नऊ वाजता प्रक्षेपित होणार्‍या 'प्राईम टाईम बुलेटीन' या कार्यक्रमासाठी रेणुका रामचंद्रन यांना सर्वोत्कृष्ट स्त्रिसुत्रधार वृत्त पुरस्कार मिळाला. तर राज्यच्या घडामोडींचा वेध घेणार्‍या 'महाराष्ट्रनामा' या वृत्त बुलेटीनसाठी राजेंद्र हुंजे यांना सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधारचा पुरस्कार मिळाला. तसेच कथाबाह्य मालिका या गटात सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधार म्हणून विनायक गायकवाड यांना पुरस्कार मिळाला. पत्रकारितेसाठी आणि प्रेक्षक,वाचकांसाठी वेळोवेळी केलेल्या या कामाचा हा गौरव आहे. तुम्हा सर्वांचे असेच प्रेम असू द्या...तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत...पाहा फक्त आयबीएन लोकमत...!!!

  • Share this:

10 मार्च

आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. यंदा म.टा.सन्मान 2012 मध्ये आयबीएन लोकमतने आपली घोडदौड कायम ठेवली आहेत. म.टा.सन्मानमध्ये कथाबाह्य मालिका, वृत्तविषयक कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट सुत्रधार पुरुष,स्त्री आणि सर्वोत्कृष्ट संकल्पना गटात आयबीएन लोकमतने आठ पैकी सात पुरस्कार पटकावले. म.टा. सन्मान सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार रिपोर्ताज या कार्यक्रमाने पटकावला. तर सर्वोत्कृष्ट स्त्रिसुत्रधार म्हणून रेणुका रामचंद्रन तर सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधार पुरस्कार राजेंद्र हुंजे यांना मिळाला.

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही म.टा.सन्मान 2012 मोठ्या थाटात पार पडला. मुंबईतील अंधेरी येथील ग्रँड मराठा या पंचतारीत हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी आयबीएन लोकमतने पुरस्कारात बाजी मारली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार 'रिपोर्ताज' या कार्यक्रमाला मिळाला. त्याचबरोबर नकुसा मुलींना प्रकाशझोतात आणणार्‍या प्राजक्ता धुळप यांच्या संकल्पनेला सर्वोत्कृष्ट संकल्पना पुरस्कार मिळाला. सातार्‍यातील 222 नकुसा म्हणजेच नकोश्या असलेल्या मुलींची नाव नकोशी ठेवण्यात आली. याला वाचा फोडत आयबीएन लोकमतने या 222 नुकसा मुलींची करुण कथा 'रिपोर्ताज' च्या माध्यमातून महाराष्ट्रापुढे आणली. राज्य सरकारने यांची दखल घेत सर्व नकुसा मुलींचे महिन्याभरात नामकरण करुन 'हव्याश्या' केल्या.

तसेच सर्वोत्कृष्ट मुं.टा. युवा मालिकेचा पुरस्कार 'आम्ही दुर्गा' या कार्यक्रमाला मिळाला. आपल्या कार्यचा ठसा उमटवणार्‍या 'सावित्रीच्या लेकी' 'आम्ही दुर्गा'च्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना भेटीला आल्यात. याचीच ही पोच पावती आयबीएन लोकमतला या पुरस्कारच्या माध्यमातून मिळाली. तसेच युवा कार्यक्रमासाठी सर्वोत्कृष्ट स्त्री सुत्रधाराचा पुरस्कार प्रियंका देसाई हिला मिळाला. तर दररोज रात्री नऊ वाजता प्रक्षेपित होणार्‍या 'प्राईम टाईम बुलेटीन' या कार्यक्रमासाठी रेणुका रामचंद्रन यांना सर्वोत्कृष्ट स्त्रिसुत्रधार वृत्त पुरस्कार मिळाला. तर राज्यच्या घडामोडींचा वेध घेणार्‍या 'महाराष्ट्रनामा' या वृत्त बुलेटीनसाठी राजेंद्र हुंजे यांना सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधारचा पुरस्कार मिळाला. तसेच कथाबाह्य मालिका या गटात सर्वोत्कृष्ट पुरूष सुत्रधार म्हणून विनायक गायकवाड यांना पुरस्कार मिळाला. पत्रकारितेसाठी आणि प्रेक्षक,वाचकांसाठी वेळोवेळी केलेल्या या कामाचा हा गौरव आहे. तुम्हा सर्वांचे असेच प्रेम असू द्या...तोपर्यंत अचूक बातमी ठाम मत...पाहा फक्त आयबीएन लोकमत...!!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 10, 2012 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading