मुंबईत सेनेच्या मदतीसाठी काँग्रेस राहणार तटस्थ

मुंबईत सेनेच्या मदतीसाठी काँग्रेस राहणार तटस्थ

  • Share this:

congress-press-conference_ebd83086-fb46-11e6-ab12-d7625b180dd1

02 मार्च :   मुंबई पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जशी जवळ येतेय तसं एकेक पत्ता उघड होताना दिसतोय. शिवसेनेला मदत करण्यासाठी काँग्रेस तटस्थ रहाण्याची शक्यता आहे. IBN लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिलीय.

गेल्या अनेक दिवसांपासून पडद्याआडून सेना-काँग्रेसची बोलणी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासूनच शिवसेना-काँग्रेसची छुपी युती असल्याचा आरोपही भाजप आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व पर्याय खुले असल्याचं सांगत शिवसेनेला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे तटस्थ राहिल्यामुळे सेनेला मदत केल्याचा प्रत्यक्ष आरोपही काँग्रेसवर येणार नसल्याचं दिसतंय.

मुंबई महापालिका  2017 - संख्याबळ - 227

  • शिवसेना - 88
  • भाजप - 82
  • काँग्रेस - 31
  • राष्ट्रवादी - 9
  • मनसे - 7
  • सपा - 6
  • एमआयएम - 2
  • अपक्ष -2

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 2, 2017, 3:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading